शस्त्रक्रिया करुन घरी गेले अन् आला ह्रदयविकाराचा झटका, सांगली शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचे निधन
By शरद जाधव | Published: December 27, 2022 01:18 PM2022-12-27T13:18:14+5:302022-12-27T13:26:35+5:30
घरी नाष्टा करत असतानाच आला ह्रदयविकाराचा झटका
सांगली : येथील डॉ. वसंतरावदादा पाटील शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड (वय ४७) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी सकाळी निधन झाले. रूग्णालयातील शस्त्रक्रियेचे काम संपवून ते घरी गेल्यानंतर त्यांना झटका आला. यातच त्यांचे निधन झाले. कुटूंबियांनी त्यांना तातडीने रूग्णालयात हलविले मात्र, त्या अगोदरच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार ते सांभाळत होते. स्त्रीरोग विभागाचेही ते प्रमुख होते. अत्यंत मनमिळावू व प्रत्येक रूग्णाला सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांचे प्राधान्य होते. कोरोना कालावधीत रूग्णालयातील ओपीडी व रूग्णांवरील उपचारासाठीही त्यांनी योग्य नियोजन केले होते.
सोमवारी सकाळी रूग्णालयात येवून गेल्यानंतर घरी नाष्टा करत असताना, त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. हे समजताच शेजारीच राहणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर तातडीने त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले मात्र, तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.