सांगली ग्रामसेवक संघटना मागण्यांबाबत ठामच!उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या बदलीशिवाय आंदोलनातून माघार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:09 PM2017-12-15T23:09:24+5:302017-12-15T23:11:30+5:30

सांगली : जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्याकडून ग्रामसेवकांचा मानसिक छळ होत आहे.

Sangli Gramsevak Sangh Sangh demands not to withdraw from the agitation without replacing deputy chief executive officer | सांगली ग्रामसेवक संघटना मागण्यांबाबत ठामच!उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या बदलीशिवाय आंदोलनातून माघार नाही

सांगली ग्रामसेवक संघटना मागण्यांबाबत ठामच!उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या बदलीशिवाय आंदोलनातून माघार नाही

Next
ठळक मुद्दे जिल्हा परिषद : ; चौकशी समिती नियुक्तआडसूळ यांची चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरुच

सांगली : जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्याकडून ग्रामसेवकांचा मानसिक छळ होत आहे. त्यांची बदली केल्याशिवाय ग्रामसेवक असहकार आंदोलन मागे घेणार नाहीत, असा पवित्रा ग्रामसेवक संघटनांच्या पदाधिकाºयांनी शुक्रवारी घेतला.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती गठित केली आहे. तरीही ग्रामसेवक आंदोलनावर ठामच आहेत.
ग्रामसेवक आणि प्रशासन यांच्यात मागील आठ दिवसांपासून सुरु असलेले मतभेद शुक्रवारीही कायम राहिले. मोर्चाला परवानगी नाकारल्याने नाराजी व्यक्त करीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांची तात्काळ बदली करण्याची मागणी संघटनांनी केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडसूळ यांची बदली होईपर्यंत असहकार आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी सांगितले.

शुक्रवारी जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या ग्रामसेवकांनी मार्केट यार्डातील कार्यालयात बैठक झाली. युनियनचे राज्याध्यक्ष ढाकणे, जिल्हाध्यक्ष भास्कर जाधव, ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांनीही भूमिका मांडली. आडसूळ यांचे दडपशाहीचे धोरण, संघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न, संघटना प्रतिनिधींना टार्गेट करून कार्यवाही करणे, कायदेशीर बाबीत अडचणीत आणणे, कार्यालयीन वेळेनंतर सोशल मीडियावरुन आदेश पाठवून तात्काळ माहिती मागविणे, ती न दिल्यास कारवाईसाठी धमकावणे, अशा अनेक तकारी संघटनांच्या आहेत.

ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्यासोबत ग्रामसेवक संघटना पदाधिकाºयांची बैठक झाली. राऊत यांच्या बैठकीनंतर आडसूळ यांच्या बदलीची मूळ मागणी दुर्लक्षित आहे. ती मान्य झाली नाही, तर आडसूळ यांच्याकडून पुन्हा सुडबुध्दीने कारवाई होण्याची भीती आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे. त्यांची जिल्ह्याबाहेर बदली झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
राज्याध्यक्ष ढाकणे यांनी, आडसूळ यांची चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्यात येईल, अशी भूमिका घेतली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडेही तक्रार केली आहे. आडसूळ यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

आडसुळांना रजेवर पाठविणार नाही : राऊत
ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. सध्या अधिवेशन सुरु असल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांना रजेवर पाठविता येणार नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी स्पष्ट केले.

मोर्चाला परवानगीबाबत अधिवेशनात लक्षवेधी
ग्रामसेवक संघटनांना जिल्हा परिषदेवर शुक्रवारी मोर्चा काढण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. ती परवानगी का नाकारण्यात आली, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये करीत, ग्रामसेवकांच्या मोर्चाबाबतचा प्रश्न लक्षवेधी केला. तसेच मोर्चास परवानगी नाकारणाºया पोलिस अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणीही चव्हाण यांनी केली.

Web Title: Sangli Gramsevak Sangh Sangh demands not to withdraw from the agitation without replacing deputy chief executive officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.