सांगलीत पाच वर्षांपासून वाळू उपसा नाही, सध्या प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:24 AM2021-03-26T04:24:59+5:302021-03-26T04:24:59+5:30

सांगली जिल्ह्यात वाळूसाठ्याच्या नद्या व ओढे : कृष्णा, येरळा, अग्रणी, महांकाली, कोकळे, बोर, नांदणी, माण, कोरडा, गावे : ताकारी, ...

Sangli has not had sand extraction for five years, the process is currently underway | सांगलीत पाच वर्षांपासून वाळू उपसा नाही, सध्या प्रक्रिया सुरू

सांगलीत पाच वर्षांपासून वाळू उपसा नाही, सध्या प्रक्रिया सुरू

Next

सांगली जिल्ह्यात वाळूसाठ्याच्या नद्या व ओढे : कृष्णा, येरळा, अग्रणी, महांकाली, कोकळे, बोर, नांदणी, माण, कोरडा,

गावे : ताकारी, दुधोंडी, तुपारी, कारंदवाडी, बहे, नरसिंहपूर, कारंदवाडी, सांगलवाडी, हरिपूर, अंकली, निलजी-बामणी, ढवळी, म्हैसाळ. शिरढोण, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, हिंगणगाव, लोणारवाडी-पांडेगाव, भाळवणी, रामापूर, बलवडी, आंधळी, राजापूर, बोरगाव, मोरगाव, निमणी, सावळज, गव्हाण.

प्रशासनाने निश्चित केलेली ठिकाणे : शिवणी, विठलापूर, वाळेखिंडी, सिंगनहळ्ळी, खंडनाळ, मुचंडी, जालिहाळ खुर्द, हिंगणगाव, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, सावळज, अंजनी.

सध्या वाळूचा एकही शासकीय ठेका दिलेला नाही. गेल्या पाच वर्षांत फक्त २०१६-१७ मध्ये वाळूचे ठेके दिले गेले. त्यातून शासनाला २४ कोटी ९५ लाखांचा महसूल मिळाला. त्यानंतर आजतागायत वाळू ठेके बंद आहेत. गेल्या पाच वर्षांपासून वाळूचे ठेके व वाहतूक बंद आहे, त्यामुळे वाळू वाहतुकीमुळे अपघात झालेले नाहीत. जिल्ह्यात काही ओढे-नाल्यांतून अत्यल्प प्रमाणात तस्करी सुरू आहे, पण त्यामुळे लक्षणीय प्रमाणात महसूल बुडाल्याची स्थिती नाही. या तस्करीमध्ये काही राजकीय नेते व त्यांचे चेलेच पुढे आहेत. अनेकदा त्यातून हाणामाऱ्या व गुन्हेही दाखल झाले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणतात, जिल्ह्यात काही औट्यांचे ठेके देण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी १३ ठिकाणे निश्चित केली आहेत. हरित न्यायालयाच्या अटी व शर्तींचे पालन करून ठेके देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

---------

Web Title: Sangli has not had sand extraction for five years, the process is currently underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.