सांगली : तासगावात हिरव्या बेदाण्यास उच्चांकी ३५५ रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 04:37 PM2018-08-17T16:37:42+5:302018-08-17T16:41:38+5:30
तासगाव बाजार समितीत झालेल्या सौद्यात हिरव्या सुटेखानी बेदाण्यास उच्चांकी ३५५ रुपये इतका दर मिळाला. सभापती रवी पाटील यांनी ही माहिती दिली.
तासगाव : तासगाव बाजार समितीत झालेल्या सौद्यात हिरव्या सुटेखानी बेदाण्यास उच्चांकी ३५५ रुपये इतका दर मिळाला. सभापती रवी पाटील यांनी ही माहिती दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणे सौद्यामध्ये लक्ष्मण पांडुरंग पवार (रा. उमदी, ता. जत) यांच्या नवीन हिरव्या सुटेखानी बेदाण्यास ४१ बॉक्स उच्चांकी प्रती किलोस ३५५ रुपये दर मिळाला.
बाजार आवारात सौद्यासाठी २१ दुकानांमध्ये एकूण आवक ३० हजार ४२५ बॉक्सची (४५ गाड्या) होऊन प्रत्यक्ष २५ हजार ६५० बॉक्सची (२८ गाड्या) विक्री झाली. हिरव्या सुटेखानी बेदाण्यास उच्चांकी दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
हिरवा बेदाण्यास सरासरी २०५ ते ३५५ इतका दर मिळाला. पिवळा बेदाणास १९० ते २३० इतका दर मिळाला. काळा बेदाण्यास ८५ ते १०५ रुपये दर मिळाला. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला बेदाणा तासगाव बाजारपेठेत सौद्यामध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील यांनी केले.