सांगली : पत्नीवर खुनीहल्ला करुन पतीची आत्महत्या, भांबर्डेतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:42 PM2018-07-30T12:42:24+5:302018-07-30T12:45:17+5:30

कौटूंबिक वादातून भांबर्डे (ता. खानापूर) येथे पत्नी सुजाता विजय बाबर (वय ४०) हिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करुन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय जयसिंग बाबर (४५) असे मृत पतीचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.

Sangli: The husband's suicide by murdering his wife, the incident in Bhopal | सांगली : पत्नीवर खुनीहल्ला करुन पतीची आत्महत्या, भांबर्डेतील घटना

सांगली : पत्नीवर खुनीहल्ला करुन पतीची आत्महत्या, भांबर्डेतील घटना

Next
ठळक मुद्देपत्नीवर खुनीहल्ला करुन पतीची आत्महत्या, भांबर्डेतील घटना पत्नीची प्रकूती गंभीर; कऱ्हाडमध्ये उपचार सुरु

विटा : कौटूंबिक वादातून भांबर्डे (ता. खानापूर) येथे पत्नी सुजाता विजय बाबर (वय ४०) हिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करुन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय जयसिंग बाबर (४५) असे मृत पतीचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.

हल्ल्यात जखमी झालेल्या सुजाता बाबर यांच्यावर कऱ्हाड (जि. सातारा) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या अजूनही बेशुद्ध असल्याने पोलिसांना त्यांचा जबाब घेता आलेला नाही. त्यामुळे हल्ल्याचे निश्चित कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.

विजय बाबर यांचे सांगोले (ता. खानापूर) मूळ गाव आहे. गेल्या पाच वर्षापासून ती भांबर्डे येथे सासरी राहत होते. त्यांना मुलगा व मुलगी आहे. मुलीचे लग्न झाले आहे, तर मुलगा परराज्यात गलई व्यवसाय करतो. घरी बाबर दाम्पत्यच राहत होते.

गेल्या काही वर्षापासून बाबर हा मानसिक आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी रात्री या दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला.

या वादातून विजय बाबर याने पत्नी सुजाता यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्या काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यानंतर विजयने स्वत: राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विटा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Sangli: The husband's suicide by murdering his wife, the incident in Bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.