सांगली : सांगलीत सात महिलांचा बेकायदेशीर गर्भपात : चौगुले हॉस्पिटलवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:00 AM2018-09-16T00:00:08+5:302018-09-16T00:10:12+5:30

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांडाची सांगलीतही पुनरावृत्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उजेडात आला. गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलवर महापालिकेच्या आरोग्य विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

 Sangli: Illegal abortions of seven women in Sangli: Chougule raids on hospital | सांगली : सांगलीत सात महिलांचा बेकायदेशीर गर्भपात : चौगुले हॉस्पिटलवर छापा

सांगली : सांगलीत सात महिलांचा बेकायदेशीर गर्भपात : चौगुले हॉस्पिटलवर छापा

googlenewsNext
ठळक मुद्देम्हैसाळच्या घटनेची पुनरावृत्ती मुदतबाह्य औैषधेइंजेक्शनसह दारूच्या बाटल्या जप्तरूपाली चौगुले चक्कर येऊन कोसळल्या

सांगली : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांडाची सांगलीतही पुनरावृत्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उजेडात आला. गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलवर महापालिकेच्या आरोग्य विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. रुग्णालयातील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कर्नाटकातील सात महिलांचा बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. १५ गर्भपाताची कीटस्, मुदतबाह्य औषधे, इंजेक्शनसह दारूच्या बाटल्या सापडल्याने त्या जप्त केल्या आहेत.

रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. रूपाली विजयकुमार चौगुले, डॉ. विजयकुमार शामराव चौगुले या दाम्पत्यासह व डॉ. स्वप्निल जगवीर जमदाडे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती. रूपाली चौगुले स्त्री-रोगतज्ज्ञ आहेत. त्यांचे पती एमबीबीएस, तर जमदाडे हे भूलतज्ज्ञ आहेत. जमदाडे हे चौगुले दाम्पत्याचे नातेवाईक आहेत. गणेशनगरमधील पाचव्या गल्लीत रुग्णालय आहे.

जमदाडेच्याच नावावर या रुग्णालयाच्या नर्सिंग हेत. त्याच रुग्णालय चालवितात. वैद्यकीय गर्भपात प्रतिबंध कायद्यांतर्गत त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. या रुग्णालयात बेकायदा गर्भपात केले जात असल्याची माहिती महापालिकेस मिळाली होती.

पथकाने गोपनीय चौकशी केली. त्यानंतर शनिवारी पथकाने शहर पोलिसांची मदत घेऊन छापा टाकला. या छाप्यात हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली. एकूण १३ गर्भवती महिलांचे केसपेपर सापडले. यातील सात महिलांचा बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याची माहिती पुढे आली. रुग्णालयात दोन तास झडती घेतल्यानंतर दारूच्या बाटल्या सापडल्याने पथकही अवाक् झाले.

मुदतबाह्ण औषधे, इंजेक्शन व गर्भपाताची १५ कीटस् सापडली. महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. झडतीचे काम सुरू असताना, रुग्णालयातील काही कर्मचाºयांनी औषधे जाळून टाकली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. रुग्णालयावर छापा पडल्याचे वृत्त समजताच परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कोणालाही आत सोडले जात नव्हते.

रूपाली चौगुले चक्कर येऊन कोसळल्या
पथकाची कारवाई सुरू असताना रूपाली चौगुले यांना चक्कर आल्याने त्या कोसळल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे स्वप्नील जमदाडे थांबून होते. रूपाली यांचे पती विजयकुमार हे कामानिमित्त मुंबईला गेले आहेत. रुग्णालयावर छापा पडल्याचे समजताच ते मुंबईतून सांगलीत येण्यास निघाले आहेत.सांगलीत गणेशनगर येथील पाचव्या गल्लीत चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलवर शनिवारी महापालिकेच्या आरोग्य पथकाने छापा टाकला.

सांगलीत गणेशनगर येथील पाचव्या गल्लीत चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलवर शनिवारी छाप्याची कारवाई पूर्ण झाल्यानंतर पथक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून बाहेर पडले.

सांगलीतील चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलवर शनिवारी छापा टाकून महापालिका अधिकाºयांनी कागदपत्रांची तपासणी केली त्यामुळे रुग्णालयात सर्वत्र साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.


रुग्णालय सील
पथकाने औषधे, इंजेक्शन साठा व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून रुग्णालय सील केले आहे. रुग्णालयातील कपाटात दारूच्या बाटल्या सापडल्या. दारू कोणासाठी लागत होती? याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू होती. याप्रकरणी रुग्णालयातील कर्मचाºयांकडे चौकशी केली; पण त्यांनीही ‘आम्हाला काही माहिती नाही’, असे सांगून हात झटकले.

‘म्हैसाळ’प्रकरणाची आठवण...
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाºया म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याकांडाचे प्रकरण अजून न्यायप्रविष्ट असताना, सांगलीत गर्भपाताचे प्रकरण उजेडात आल्याने खळबळ माजली आहे. दोन वर्षांपूर्वी म्हैसाळमध्ये डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयात भ्रूणहत्याकांड उघडकीस आले होते. याप्रकरणी १४ संशयितांना अटक करण्यात आली होती. खिद्रापुरे याच्या रुग्णालयात गर्भपात केलेले १९ अर्भक पोलिसांनी जप्त केले होते. या अर्भकांची ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली. त्यातील काही अर्भक कुजलेल्या अवस्थेत होते. एकूण नऊपैकी आठ अर्भकांचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यात पाच पुरुष जातीचे, तर तीन स्त्री जातीचे अर्भक होते.
 

चौगुले हॉस्पिटलची चौकशी केल्यानंतर याठिकाणी संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचे तपासणीत समोर आले असून, या हॉस्पिटलकडे रीतसर गर्भपात किंवा तपासणीचा कोणताही परवाना नाही. याशिवाय कालबाह्य ठरलेली औषधे, गर्भपाताचे कीट अशा गोष्टी सापडल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल केला आहे.
- डॉ. संजय कवठेकर,
आरोग्य अधिकारी सांगली, मिरज, कुपवाड, महापालिका

 

Web Title:  Sangli: Illegal abortions of seven women in Sangli: Chougule raids on hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.