Sangli: सांगली 'चेंबर'च्या चुरशीच्या निवडणूकीत सत्ताधार्यांचीच बाजी, व्यापारी एकता पॅनेलला आठ जागा
By अशोक डोंबाळे | Published: October 11, 2023 11:29 AM2023-10-11T11:29:31+5:302023-10-11T11:36:45+5:30
Sangli News: सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी व्यापारी एकता पॅनेलने आठ जागांवर विजय मिळवत सत्ता राखण्यात यश मिळविले. विरोधी व्यापारी विकास आघाडीने जोरदार लढत देत पाच जागांवर विजय खेचून आणला.
- अशोक डोंबाळे
सांगली - सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी व्यापारी एकता पॅनेलने आठ जागांवर विजय मिळवत सत्ता राखण्यात यश मिळविले. विरोधी व्यापारी विकास आघाडीने जोरदार लढत देत पाच जागांवर विजय खेचून आणला.
सांगली चेंबरची निवडणूक यंदा प्रथमच चुरशीची झाली. सांगली बाजार समितीच्या वसंतदादा पाटील सभागृहात मंगळवारी सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत चुरशीने मतदान झाले. चेंबरचे ३६१ सभासद असून त्यापैकी ३५५ सभासदांनी मतदान केले. सायंकाळी मतमोजणीला सुरुवात झाली रात्री साडेदहा वाजता दोन फेऱ्या पूर्ण झाल्या. सत्ताधारी व्यापारी एकता पॅनेलचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष शरद शहा यांनी तर विरोधी व्यापारी विकास आघाडी पॅनेलचे नेतृत्व माजी अध्यक्ष अशोक पाटील यांनी केले. रात्री सात वाजता १०० मतांच्या पहिल्या फेरीत विरोधी व्यापारी विकास आघाडीचे आठ तर सत्ताधारी गटाचे पाच उमेदवार आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीचा निकाल सव्वा दहा वाजता जाहीर करण्यात आला. दुसऱ्या फेरीमध्ये सत्ताधारी पॅनेलने आघाडी घेतली. त्यांचे आठ उमेदवार पुढे राहिले तर विरोधी एकता पॅनेलचे पाच उमेदवार आघाडीवर राहिले. सत्ताधारी गटाच्या आठही उमेदवारांनी शेवटपर्यंत मतांची आघाडी घेतली. रात्री उशीरा मतमोजणी संपली. यावेळी सत्ताधारी गटाचे आठ तर विरोधी गटाचे पाच उमेदवार विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर केले.
चेंबर ऑफ कॉमर्सचे विजयी उमेदवार
सांगली चेंबर निवडणूकमध्ये अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे आणि कंसात मिळालेली मते. रोहित आरवाडे -२२९, गोपाल मर्दा-२१२, अविनाश अट्टल -२०८, शरद शहा-२०७, अशोक पाटील-२०६, अभय मगदूम -१९२, हरीश पाटील-१८८, समिर साखरे-१८८, विकास मोहीते-१८७, अमर देसाई -१८४, अप्पासाहेब पाटील -१८४, दिपक चौगुले -१८२, सचिन घेवारे -१७७.