सांगली : मिरज शहरात येणाऱ्या जड वाहतुकीस सायंकाळी पाच तास प्रवेश मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 05:30 PM2018-03-05T17:30:39+5:302018-03-05T17:30:39+5:30
मिरज शहरात जड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमिवर मिरज शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वाहतूक नियोजन 6 ते 20 मार्च 2018 पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. यानुसार मिरज शहरातील येणाऱ्या जड वाहतुकीस सायंकाळी 16.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत पाच तास प्रवेश मनाई करण्यात येत आहे.
सांगली : मिरज शहरात जड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमिवर मिरज शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वाहतूक नियोजन 6 ते 20 मार्च 2018 पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. यानुसार मिरज शहरातील येणाऱ्या जड वाहतुकीस सायंकाळी 16.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत पाच तास प्रवेश मनाई करण्यात येत आहे.
वाहनचालक व जनतेने नमूद केलेल्या वाहतूक नियोजनास सहकार्य करावे. तसेच आपल्या हरकती, सूचना असल्यास पाठवाव्यात, जेणेकरून प्राप्त सूचनांचे अवलोकन केल्यानंंतर वाहतूक नियोजनात योग्य ते बदल करण्यात येतील, असे आवाहन पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केले आहे.
तासगाव, सोलापूर, पंढरपूरवरून कर्नाटक, शिरोळ, कोल्हापूरकडे जाणारी जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 16.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत प्रवेश मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे
1) कर्नाटक जाणारा रस्ता - तासगाव फाटा - सुभाषनगर - टाकळी रोड - बोलवाड फाटा - बेडग रोड - विजयनगर - म्हैशाळ 2) शिरोळकडे जाणारा रस्ता - तासगाव फाटा - सुभाषनगर - टाकळी रोड - बोलवाड फाटा - बेडग रोड - कत्तलखाना - म्हैसाळ उड्डाण पूल - शास्त्री चौक - कृष्णा घाट - अर्जुनवाड - शिरोळ 3) कोल्हापूरकडे जाणारा रस्ता - तासगाव फाटा - सुभाषनगर - टाकळी रोड - बोलवाड फाटा - बेडग रोड - कत्तलखाना - म्हैसाळ उड्डाण पूल - शास्त्री चौक - म. फुले चौक - अंकली फाटा.
कर्नाटक, म्हैसाळकडून मिरज शहरात जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 16.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत प्रवेश मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे -
1) सांगलीकडे जाणारा रस्ता - म्हैसाळ - विजयनगर - बेडग आडवा रस्ता - टाकळी रोड - सुभाषनगर - तासगाव फाटा - गांधी चौक - सांगली 2) कोल्हापूरकडे जाणारा रस्ता - म्हैसाळ - म्हैसाळ उड्डाण पूल - शास्त्री चौक - म. फुले चौक - अंकली फाटा. 3) तासगाव, पंढरपूर, सोलापूरकडे जाणारा रस्ता - म्हैसाळ - विजयनगर - बेडग आडवा रस्ता - टाकळी रोड - सुभाषनगर - तासगाव फाटा.
अंकली फाट्यावरून मिरज शहरात जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 16.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत प्रवेश मनाई करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे - तासगाव, पंढरपूर, सोलापूरकडे जाणारा रस्ता - अंकली फाटा - शास्त्री चौक - म्हैसाळ उड्डाण पूल - बेडग आडवा रस्ता - टाकळी रोड - सुभाषनगर - तासगाव फाटा.
सुभाषनगर येथून मिरज शहरात जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 16.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत प्रवेश मनाई करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे - 1) सांगलीकडे जाणारा रस्ता - सुभाषागर - तासगाव फाटा - गांधी चौक - सांगली. 2) कर्नाटककडे जाणारा रस्ता - सुभाषागर - टाकळी रोड - बोलवाड फाटा - बेडग रोड - विजयनगर - म्हैसाळ 3) शिरोळ व कोल्हापूरकडे जाणारा रस्ता - सुभाषागर - टाकळी रोड - बोलवाड फाटा - बेडग रोड - कत्तलखाना - म्हैसाळ उड्डाण पूल - शास्त्री चौक.