सांगली : गुरूवंदनामध्ये रंगला तालासुरांचा आविष्कार, ºिहदमह्णतर्फे आयोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:03 PM2018-08-13T12:03:23+5:302018-08-13T12:08:14+5:30

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे बहारदार शास्त्रीय गायन, तबला, ढोलक, ढोलकी, पखवाज आदींचे उत्साह वाढविणारे तालवाद्य कचेरीचे अभिनव वादन अशा सुरमयी वातावरणात गुरूवंदना हा कार्यक्रम झाला. सांगलीकर रसिकांनी कार्यक्रमास गर्दी करत कलाकारांच्या आविष्काराला दाद दिली.

Sangli: The invention of Talaasura in Guruvandana, organized by HHIDHAM | सांगली : गुरूवंदनामध्ये रंगला तालासुरांचा आविष्कार, ºिहदमह्णतर्फे आयोजन 

सांगली : गुरूवंदनामध्ये रंगला तालासुरांचा आविष्कार, ºिहदमह्णतर्फे आयोजन 

googlenewsNext
ठळक मुद्दे गुरूवंदनामध्ये रंगला तालासुरांचा आविष्कार, ºिहदमह्णतर्फे आयोजन अशोक नाडगीर यांचे बहारदार शास्त्रीय गायन

सांगली : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे बहारदार शास्त्रीय गायन, तबला, ढोलक, ढोलकी, पखवाज आदींचे उत्साह वाढविणारे तालवाद्य कचेरीचे अभिनव वादन अशा सुरमयी वातावरणात गुरूवंदना हा कार्यक्रम झाला. सांगलीकर रसिकांनी कार्यक्रमास गर्दी करत कलाकारांच्या आविष्काराला दाद दिली.

द ºिहदम अ‍ॅकॅडमीच्यावतीने विश्वविख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखा खॉसाहेब आणि तबलाविभूषण उस्ताद हाजी बाळासाहेब मिरजकर यांच्या परंपरेतील शिष्यवर्गांनी एकत्र येत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात गुरू प्रतिमा पूजन व दीपप्रज्ज्वलनाने झाली. प्रारंभी ºिहदमच्या ५० शिष्यांनी तबलावादन केले. त्यानंतर पंडित अशोक नाडगीर (हुबळी) यांचे गायन झाले. या शास्त्रीय गायनात शुध्द कल्याण या रागात ख्याल गायन करून त्यांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांनी शुध्द कल्याण याच रागात जोड चीज सादर करून श्रोत्यांना खिळवून ठेवले. त्यांना तबलासाथ सागर सुतार यांनी, तर हार्मोनियमवर धनंजय गाडगीळ यांनी साथ दिली.

या बहारदार शास्त्रीय गायनानंतर अ‍ॅकॅडमीच्या ज्येष्ठ शिष्यवर्गाने तालवाद्य कचेरी हा अभिनव कलाविष्कार सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. त्यात सागर सुतार, पोपट जावीर, निशाद कुंभारे, विजय सांडगे, नामदेव नरळे, दादा मुळे (तबला), धनंजय गुरव (ढोलक), धनाजी केंगार (ढोलकी), नंदकुमार खोत (पखवाज) यांनी वादन केले.

दुसऱ्या पुष्पात सचिन पटवर्धन (इंदोर) यांनी स्पॅनिश गिटार या वाद्यावर आपली कला सादर केली. त्यांनी सुरुवातीस आलाप, जोड झाला व त्यानंतर विलंबित गत झपताल श्री या रागात पेश केली. श्री रागात द्रुत बंदीश सादर केली व गिटार वादनाचा समारोप केला. त्यांना पंडित मनमोहन कुंभारे यांनी तबला साथ दिली.

कुंभारे यांच्या तबलावादनास दाद

पंडित मनमोहन कुंभारे यांच्या तबला सोलो वादनास रसिकांनी विशेष दाद दिली. ताल त्रितालात त्यांनी पेशकार, कायदे अनेक घराण्यातील बंदिशी रेले, चलन चक्रधार फर्माईशी आणि कमाली चक्रधार पेश केली. त्यांना हार्मोनियमवर लहरा साथ विजय सांडगे यांनी दिली.

Web Title: Sangli: The invention of Talaasura in Guruvandana, organized by HHIDHAM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.