सांगली : घराच्या उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविणे ठरणार अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 07:23 PM2018-04-27T19:23:14+5:302018-04-27T19:23:14+5:30

ग्रामपंचायतीमध्ये गावातील, गावठाणमधील मिळकतीचे वर्णन नोंदवहीत केले जाते. त्या नोंदीचा ८ अ चा उताºयावर म्हणजेच जुन्या नोंद असलेल्या घरावर आजपर्यंत नागरिकांना कर्ज काढून बोजा चढविता येत होता. पण सरकारी आदेशाने यापुढे कोणत्याही बँकेच्या कर्जाचा बोजा ८ अ च्या नोंदवहीत चढविला जाणार नाही. आता घरावर बोजा चढविणे अवैध ठरणार आहे. त्यामुळे बिगरशेती धारक व सामान्य नागरिक हतबल झाले आहेत.

Sangli: It will be decided to put the burden of debt at home | सांगली : घराच्या उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविणे ठरणार अवैध

सांगली : घराच्या उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविणे ठरणार अवैध

Next
ठळक मुद्देघराच्या उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविणे ठरणार अवैधसरकारच्या आदेशाने नागरिक हतबलसामान्य नागरिक, बिगरशेती धारकांचे हाल

अतुल जाधव 

देवराष्ट्रे : ग्रामपंचायतीमध्ये गावातील, गावठाणमधील मिळकतीचे वर्णन नोंदवहीत केले जाते. त्या नोंदीचा ८ अ चा उताऱ्यावर म्हणजेच जुन्या नोंद असलेल्या घरावर आजपर्यंत नागरिकांना कर्ज काढून बोजा चढविता येत होता. पण सरकारी आदेशाने यापुढे कोणत्याही बँकेच्या कर्जाचा बोजा ८ अ च्या नोंदवहीत चढविला जाणार नाही. आता घरावर बोजा चढविणे अवैध ठरणार आहे. त्यामुळे बिगरशेती धारक व सामान्य नागरिक हतबल झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाने सर्व ग्रामपंचायतींना डिसेंबर २०१७ मधील दिलेल्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायत कायदा १९५८ अंतर्गत कर व फी कायद्यानुसार व १९६० च्या तरतुदीनुसार नंबर ८ मिळकतीवर कर्जाचा बोजा व इतर कोणताही बोजा नोंद करायची तरतूद नाही. नंबर ८ हा अभिलेख नसून कर आकारणी वही असल्याने यावर कोणताही बोजा अथवा भार नोंद करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याची अंमलबजावणी सर्व ग्रामपंचायतींमध्ये चालू झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल चालू झाले आहेत.

अनेक नागरिक बिगरशेती जमीनधारक आहेत. तुकडेमोड कायद्यामुळे अनेक कुटुंबांच्या नावावर जमिनीची नोंद नाही. विभक्त कुटुंबियांना जमीन नाही. यासह ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची स्थावर मालमत्ता ही घरच असते. या घराची नोंद ८ अव्यतिरिक्त कुठेही नसते. त्यामुळे अडी-अडचणीत अचानक पैशाची गरज भासल्यास सहकारी पतपेढी, बँक यांचे कर्ज ८ अ मिळकतीवर घेऊन समस्या सोडविणे शक्य होते. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

८ अ उताऱ्यांवर कर्ज वाटप बंद

सहकार विभागाने सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून सहकारी बँका, पंतसंस्था, पतपेढी यांना याबाबतच्या सूचना करुन लेखी आदेश दिल्यामुळे सर्व सहकारी कर्ज पुरवठा संस्थांनी ८ अ च्या मिळकतीवरील कर्ज वाटप बोजा नोंद होत नसल्यामुळे बंद केले आहे.

बोजा कमी करण्याचे काम चालू

सरकारी आदेश येण्याआधी ज्या ८ अ च्या मिळकतीवरील बोजा नोंद आहे, अशा नोंदी संबंधित बँक व पतसंस्थांच्या पत्राने कमी करण्याचे काम चालू आहे.

 

Web Title: Sangli: It will be decided to put the burden of debt at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.