‘सांगली’ जयसिंगपूरला विना थांबा

By admin | Published: April 17, 2016 11:25 PM2016-04-17T23:25:55+5:302016-04-18T00:22:41+5:30

‘विना थांबा’ ठरतोय मारक : कोल्हापूर, इचलकरंजी मार्गावरील प्रवाशांची गैरसोय

'Sangli' Jaysingpur is unstoppable | ‘सांगली’ जयसिंगपूरला विना थांबा

‘सांगली’ जयसिंगपूरला विना थांबा

Next

संतोष बामणे -- जयसिंगपूर --कोल्हापूर-सांगली मार्गावर विना थांबा, विनावाहक एस़टी़ गेल्या आठवडाभरापासून सुरू झाली आहे़ या एस़टी़मुळे सांगली व कोल्हापूरला थेट प्रवास करणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे़ मात्र, जयसिंगपूर व अन्य ठिकाणी या मार्गावर थांबणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे़ त्यामुळे ही सेवा शिरोळ तालुक्यातील प्रवाशांना डोकेदुखी ठरली आहे़
धावत्या युगात कमी कालावधीत कामगारांना व प्रवाशांना थेट त्या-त्या गावाला जाण्यासाठी सोय व्हावी, या हेतूने सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी या चार आगारांकडून सांगली-कोल्हापूर, सांगली-इचलकरंजी व मिरज-इचलकरंजी अशा विना थांबा, विनावाहक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत़ यामुळेच सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी या चार शहरांतील प्रवाशांच्या वेळेची बचत झाली असली तरी या मार्गावर मुख्य जयसिंगपूर बसस्थानक असून, येथून हजारो प्रवासी दैनंदिन प्रवास करीत असतात़ याबरोबर सांगली-कोल्हापूर, इचलकरंजी या मार्गावर मोठमोठी गावे असल्यामुळे प्रवासी वर्ग अधिक आहे़ मात्र, या सेवेमुळे जयसिंगपूरच्या प्रवाशांना विना थांब्याचा त्रास होत असून, ताटकळत थांबून साधी गाडी येईपर्यंत वाट पाहावी लागत आहे़
कोल्हापूर-सांगली विना थांबा बस सुरू असल्याने जयसिंगपूर बसस्थानकात कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या घटली असून, लांब पल्ल्याच्या सोलापूर, पंढरपूर, आदी मराठवाड्यातून येणाऱ्या गाड्यांवर जयसिंगपूरच्या प्रवाशांना विसंबून राहावे लागत आहे़ दरम्यान, सांगली-कोल्हापूर मार्गावर विनावाहक वगळता एशियाड बसेसची संख्या वाढली आहे़ त्यामुळे प्रवाशांना या गाडीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़
दरम्यान, सांगली-इचलकरंजी व मिरज-इचलकरंजी या मार्गावर धामणी, अंकली, उदगाव, जयसिंगपूर, खोतवाडी, यड्राव, चिपरी, तारदाळ, आदी गावांतील प्रवासी मोठ्या संख्येने असल्यामुळे विना थांबा सेवेचा त्रास या गावांनाही सहन करावा लागत आहे़ प्रवासी बसथांब्यावर थांबले असता विना थांबा बस निम्मी रिकामी समोरून जाते. मात्र, तिला थांबा नसल्यामुळे ती थांबत नाही. तसेच त्यामागून येणारी बस ही साधी असल्यास ती प्रवासी भरगच्च भरून येत असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्था
निर्माण झाली आहे़

प्रवाशांतून तीव्र नाराजी
सांगली-कोल्हापूर महामार्गावरील जयसिंगपूर हे मोठे शहर आहे़ येथून दररोज १६०० बसेसची
ये-जा होत असल्याने प्रवासी वर्ग मोठा आहे़ यातच विना थांबा, विनावाहक इचलकरंजी, कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एस़टी.चा नेमका फायदा प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ होताना दिसत आहे़ त्यामुळे जयसिंगपूर शहरातून या बसला तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे़

प्रवाशांतून तीव्र नाराजी
सांगली-कोल्हापूर महामार्गावरील जयसिंगपूर हे मोठे शहर आहे़ येथून दररोज १६०० बसेसची
ये-जा होत असल्याने प्रवासी वर्ग मोठा आहे़ यातच विना थांबा, विनावाहक इचलकरंजी, कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एस़टी.चा नेमका फायदा प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ होताना दिसत आहे़ त्यामुळे जयसिंगपूर शहरातून या बसला तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे़
सांगली-कोल्हापूर मार्गावर विना थांबा बससेवा सुरू झाल्यामुळे जयसिंगपूरसह अन्य ठिकाणच्या प्रवाशांना ताटकळत थांबल्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही़ तर साधी बस आल्यास ती प्रवासी भरगच्च भरून येते़ त्यामुळे कोल्हापूरला कसे जायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
सांगली-कोल्हापूर मार्गावर साध्या गाड्यांची सोय करून सर्व ठिकाणी थांबतील व ग्रामीण भागातील लोकांनाही या एस़टी़चा लाभ होईल, असा विचार महामंडळाने करून साध्या गाड्याही प्रत्येक अर्ध्या तासाला सोडणे गरजेचे आहे़

Web Title: 'Sangli' Jaysingpur is unstoppable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.