दिल्ली आंदोलनाला पाठिंब्यासाठी सांगलीत ‘किसान बाग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:10 AM2020-12-05T05:10:25+5:302020-12-05T05:10:25+5:30
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी सांगलीत स्टेशन चौकात वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यासमोर किसान बाग आंदोलन सुरू झाले. लोकमत न्यूज नेटवर्क ...
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी सांगलीत स्टेशन चौकात वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यासमोर किसान बाग आंदोलन सुरू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून ‘किसान बाग’ आंदोलन सुुरू केले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह डॉ. संजय पाटील, उमेश देशमुख, विकास मगदूम, सतीश साखळकर, सुधीर नलवडे, मुनीर मुल्ला, युसूफ मेस्त्री, राजू कांबळे, हणमंत मोहिते, श्रीमंत खरमाटे, जगदीश नलवडे, महेश जोतराव आदी सहभागी झाले.
स्टेशन चौकात वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यासमोर आंदोलकांनी ठिय्या मारला. शहरातील विविध संघटनांनी आंदोलकांना भेटून पाठिंबा दिला. खराडे म्हणाले की, केंद्र सरकारच्या अन्यायी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून किसान बाग सुरू केले आहे. दिल्लीतील आंदोलन संपेपर्यंत सुरूच राहील. भाजप सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपू पाहत आहे. अत्याचार करत आहे. संजय पाटील म्हणाले की, दडपशाहीला शेतकरी जशास तसे उत्तर देतील. शेतकऱ्यांच्या जिवावर सत्तेत पोहोचलेल्यांना पायउतार करायला वेळ लागणार नाही. उद्योगपतींच्या हितासाठी सरकारचा खटाटोप सुरू आहे. कायदे मागे घेईपर्यंत संघर्ष सुरूच राहील.
---------------