चांगल्या राहणीमानाच्या पाहणीत सांगली, कोल्हापूर शहरे काठावर, ऑक्सफर्ड इकॉनॅमिक्सचा अहवाल प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 11:47 AM2024-05-25T11:47:30+5:302024-05-25T11:47:49+5:30

पाहणीमध्ये जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन यांच्या कामाचे मूल्यांकन

Sangli, Kolhapur cities edge in quality of life survey, Oxford Economics report released | चांगल्या राहणीमानाच्या पाहणीत सांगली, कोल्हापूर शहरे काठावर, ऑक्सफर्ड इकॉनॅमिक्सचा अहवाल प्रसिद्ध

चांगल्या राहणीमानाच्या पाहणीत सांगली, कोल्हापूर शहरे काठावर, ऑक्सफर्ड इकॉनॅमिक्सचा अहवाल प्रसिद्ध

सांगली : चांगल्या राहणीमानाबाबतीत जगातील १००० शहरांमध्ये सांगली ९४३ व्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर शहर ८७७ क्रमांकावर आहे. दोन्ही शहरे काठावर पास झाली आहेत. ऑक्सफर्ड आर्थिक निर्देशांकातून ही माहिती पुढे आली आहे. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ग्लोबल सिटी इंडेक्स २०२४ अंतर्गत अहवाल जाहीर करण्यात आला.

जिल्ह्यातील प्रशासन, अर्थव्यवस्था, राहणीमान, पर्यावरण संतुलन, मनुष्यबळ आदी अनेक बाबींची पाहणी या अहवालासाठी करण्यात आली होती. त्यातून जगभरातील पहिल्या १००० शहरांची यादी निश्चित करण्यात आली. ही १००० शहरे जगातील ६० टक्के जीडीपी आणि ३० टक्के लोकसंख्येची आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, वसई-विरार, नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर व सांगली शहरांचा समावेश आहे.

० ते १०० गुणांकनानुसार शहरांची क्रमवारी निश्चित करण्यात आली. पाहणीमध्ये प्रशासनाच्या कामकाजाचीही दखल घेण्यात येते. जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन यांच्या कामाचे मूल्यांकन केले जाते.

Web Title: Sangli, Kolhapur cities edge in quality of life survey, Oxford Economics report released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.