सांगलीत कृष्णा पुन्हा पात्राकडे, पाणी पातळीत घट : नागरिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 04:05 PM2020-10-17T16:05:27+5:302020-10-17T16:07:01+5:30
rain, sangli कोयना व चांदोली धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्याने कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत दुपारपर्यंत चार फुटाची घट झाली आहे. त्यामुळे पुराचे संकट टळले असून कृष्णा नदीचे पाणी पुन्हा पात्रात गेले आहे.
सांगली: कोयना व चांदोली धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्याने कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत दुपारपर्यंत चार फुटाची घट झाली आहे. त्यामुळे पुराचे संकट टळले असून कृष्णा नदीचे पाणी पुन्हा पात्रात गेले आहे.
कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्याने कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. सांगली येथील आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी गुरुवारी रात्री ३७ फुटावर गेली होती.
शहरातील सुर्यवंशी प्लॉट, आरवाडे प्लॉट, इनामदार प्लॉट, वॉटर पार्वष्ठ, पटवर्धन कॉलनी, साईनाथनगर आदी परिसरातील ६४० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले. तर पुराच्या पाण्यामुळे कृष्णा काठावरील महादेव मंदिर, कृष्णामाई मंदिर पाण्याखाली गेले. कर्नाळ रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.
शुक्रवारी मात्र सांगलीकरांना दिलासा मिळाला. पावसाचा जोर कमी झाल्याने पहाटेपासून पाणीपातळीत घट होऊ लागली. दुपारी दोन वाजेपर्यंत चार फुट पाणी उतरले होते. कृष्णा नदी पुन्हा पात्राकडे गेली होती. कर्नाळ रस्त्यावरील पाणीही ओसरले होते. सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमधील कुटूंबेही घराकडे परतली आहेत.
कॉलनीत पाण्याचा वेढा
मुसळधार पावसामुळे शहरातील नाले तुंबल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले होते. शामरावनगर, टिंबर एरिया, स'ाद्रीनगर, शिंदे मळा, गर्व्हेमेंट कॉलनी परिसरातील कॉलन्यात अजूनही पाणी साचून होते. पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. आता या पाण्याला दुर्गंधी येत लागल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.