सांगलीत कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा
By admin | Published: November 2, 2014 10:00 PM2014-11-02T22:00:33+5:302014-11-02T23:30:54+5:30
प्रदूषित पाणी मिसळू लागले : नदीच्या पाण्याचा रंग झाला हिरवा; महापालिकेची बघ्याची भूमिका
सांगली : सांगलीकरांची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. नदीपात्रात साचलेल्या शेवाळामुळे नदीच्या पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. सरकारी घाटावर दारूच्या बाटल्या इतस्तत: फेकण्यात आल्याने तेथे काचांचा खच पडला आहे. त्याचप्रमाणे परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. असे असले तरीही महापालिका प्रशासन आणि सांगलीकरांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
मागील महिन्यात केंद्र सरकारने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान हाती घेतले होते. त्यादिवशी शहरातील अनेक सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. परंतु त्यानंतर बहुतांशीजणांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला असल्याचेच दिसत आहे. शहरातील विविध भागांत कचराकुंड्या ओसंडून वाहत असतानाच आता जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीलासुध्दा अस्वच्छतेचा विळखा पडलेला आहे. महापालिका प्रशासनाने आयर्विन पुलाचे सुशोभिकरण करून शहराच्या सौंदर्यात भर टाकली असली तरी, पुलाखालची स्वच्छता करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. मागील महिन्यापेक्षा नदीचे पाणी आटले असल्याने नदीत टाकण्यात आलेला कचरा आता नदीकाठावर आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सरकारी घाटावर रात्रीच्या सुमारास दारुड्यांच्या पार्ट्या रंगत असल्याचे चित्र आहे. तेथे काचांचा खच पडला आहे. येथे सायंकाळच्या सुमारास लहान मुले खेळत असतात. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात शेवाळ साचले आहे. त्यामुळे पाण्याचा रंग हिरवा होत चालला आहे. नागरिक कपडे आणि जनावरे धुण्याचे काम नित्यनेमाने करतात. त्यामुळे देखील नदी प्रदूषित होत आहे. नदीत शेरीनाल्याचे पाणी मिसळत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)सांगलीत कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा
प्रदूषित पाणी मिसळू लागले : नदीच्या पाण्याचा रंग झाला हिरवा; महापालिकेची बघ्याची भूमिका
सांगली : सांगलीकरांची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. नदीपात्रात साचलेल्या शेवाळामुळे नदीच्या पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. सरकारी घाटावर दारूच्या बाटल्या इतस्तत: फेकण्यात आल्याने तेथे काचांचा खच पडला आहे. त्याचप्रमाणे परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. असे असले तरीही महापालिका प्रशासन आणि सांगलीकरांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
मागील महिन्यात केंद्र सरकारने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान हाती घेतले होते. त्यादिवशी शहरातील अनेक सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. परंतु त्यानंतर बहुतांशीजणांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला असल्याचेच दिसत आहे. शहरातील विविध भागांत कचराकुंड्या ओसंडून वाहत असतानाच आता जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीलासुध्दा अस्वच्छतेचा विळखा पडलेला आहे. महापालिका प्रशासनाने आयर्विन पुलाचे सुशोभिकरण करून शहराच्या सौंदर्यात भर टाकली असली तरी, पुलाखालची स्वच्छता करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. मागील महिन्यापेक्षा नदीचे पाणी आटले असल्याने नदीत टाकण्यात आलेला कचरा आता नदीकाठावर आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सरकारी घाटावर रात्रीच्या सुमारास दारुड्यांच्या पार्ट्या रंगत असल्याचे चित्र आहे. तेथे काचांचा खच पडला आहे. येथे सायंकाळच्या सुमारास लहान मुले खेळत असतात. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात शेवाळ साचले आहे. त्यामुळे पाण्याचा रंग हिरवा होत चालला आहे. नागरिक कपडे आणि जनावरे धुण्याचे काम नित्यनेमाने करतात. त्यामुळे देखील नदी प्रदूषित होत आहे. नदीत शेरीनाल्याचे पाणी मिसळत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)नसांगलीत कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा
प्रदूषित पाणी मिसळू लागले : नदीच्या पाण्याचा रंग झाला हिरवा; महापालिकेची बघ्याची भूमिका
सांगली : सांगलीकरांची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. नदीपात्रात साचलेल्या शेवाळामुळे नदीच्या पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. सरकारी घाटावर दारूच्या बाटल्या इतस्तत: फेकण्यात आल्याने तेथे काचांचा खच पडला आहे. त्याचप्रमाणे परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. असे असले तरीही महापालिका प्रशासन आणि सांगलीकरांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
मागील महिन्यात केंद्र सरकारने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान हाती घेतले होते. त्यादिवशी शहरातील अनेक सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. परंतु त्यानंतर बहुतांशीजणांना स्वच्छता अभियानाचा विसर पडला असल्याचेच दिसत आहे. शहरातील विविध भागांत कचराकुंड्या ओसंडून वाहत असतानाच आता जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीलासुध्दा अस्वच्छतेचा विळखा पडलेला आहे. महापालिका प्रशासनाने आयर्विन पुलाचे सुशोभिकरण करून शहराच्या सौंदर्यात भर टाकली असली तरी, पुलाखालची स्वच्छता करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. मागील महिन्यापेक्षा नदीचे पाणी आटले असल्याने नदीत टाकण्यात आलेला कचरा आता नदीकाठावर आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सरकारी घाटावर रात्रीच्या सुमारास दारुड्यांच्या पार्ट्या रंगत असल्याचे चित्र आहे. तेथे काचांचा खच पडला आहे. येथे सायंकाळच्या सुमारास लहान मुले खेळत असतात. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात शेवाळ साचले आहे. त्यामुळे पाण्याचा रंग हिरवा होत चालला आहे. नागरिक कपडे आणि जनावरे धुण्याचे काम नित्यनेमाने करतात. त्यामुळे देखील नदी प्रदूषित होत आहे. नदीत शेरीनाल्याचे पाणी मिसळत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
कृष्णा नदी अस्वच्छ होऊ नये यासाठी आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. आज सकाळी २० कार्यकर्त्यांनी नदीपात्रात उतरुन सुमारे दोन ट्रॉली कचरा बाहेर काढला आहे. दुर्दैवाने नदी स्वच्छतेकरिता आम्ही केलेल्या आवाहनास सांगलीकरांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. प्रदूषण नियंत्रणाचे देखील दुर्लक्षच आहे. परंतु आम्ही नदी स्वच्छ होईपर्यंत हा उपक्रम सुरुच ठेवणार आहोत.
- संजय चव्हाण,
अध्यक्ष, विसावा मंडळ सांगली.
नदीकाठावर विसर्जित मूर्ती
अंधश्रध्दा निर्मूलन समिती, डॉल्फीन नेचर ग्रुप, आभाळमाया फौडेंशन आदी सामाजिक संघटनांच्यावतीने गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक शाडूच्या अथवा कागदाच्या गणेशमूर्तींचीच प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले होते. परंतु याकडे काहींनी दुर्लक्ष केल्याने विसर्जित केलेल्या प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती सध्या नदीकाठावर असल्याचे चित्र आहे.
गणेश विसर्जनावेळी सामाजिक संघटनांच्या पुढाकारामुळे नदीत विसर्जित करण्यात येणारे कित्येक टन निर्माल्य जमा केले होते आणि महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने खत निर्मितीचा उपक्रम राबविण्यात आला होता. परंतु सध्या कचऱ्यामुळेच प्रदूषित होणाऱ्या नदीला वाचविण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक संघटना आणि प्रशासनाने हातात हात घालून कार्य करण्याची आवश्यकता आहे.