सांगलीत कृष्णा नदीपातळी ३९ फुटांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 03:50 PM2020-08-18T15:50:25+5:302020-08-18T15:51:34+5:30
सांगली जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. कृष्णा व वारणा नदीपातळीत होणारी वाढ मंदावली असून धरणातील विसर्गही कमी होण्याची ंिचन्हे आहेत. सांगलीतील आयर्विनजवळील पाणीपातळी ३९ फुटांवर गेली आहे.
Next
ठळक मुद्देसांगलीत कृष्णा नदीपातळी ३९ फुटांवरमंदगतीने वाढ : धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
सांगली : जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. कृष्णा व वारणा नदीपातळीत होणारी वाढ मंदावली असून धरणातील विसर्गही कमी होण्याची ंिचन्हे आहेत. सांगलीतील आयर्विनजवळील पाणीपातळी ३९ फुटांवर गेली आहे.
कोयना धरण क्षेत्रात दुपारी बारा वाजता १ मि.मी. पावसाची नोंद झाली. वारणा धरण क्षेत्रातही मंगळवारी सकाळी ४७ मि.मी. पाऊस झाला. दिवसभर उघडिप मिळाल्यास नदीपातळी कमी होण्यास मदत मिळणार आहे. तशी शक्यता दिसत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.