सांगली : कुपवाडमध्ये गुंडाचा खून, काठीने मारहाण : तीन संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:43 PM2018-12-14T12:43:49+5:302018-12-14T12:45:41+5:30
पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अखिलेश ऊर्फ सैफअली सरदार मगदूम (वय २२, दत्तनगर, बामणोली, ता. मिरज) याचा काठीने बेदम मारहाण करुन खून करण्यात आला. कुपवाड-बुधगाव रस्त्यावर अजिंक्यनगर येथे शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी चार संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कुपवाड : पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अखिलेश ऊर्फ सैफअली सरदार मगदूम (वय २२, दत्तनगर, बामणोली, ता. मिरज) याचा काठीने बेदम मारहाण करुन खून करण्यात आला. कुपवाड-बुधगाव रस्त्यावर अजिंक्यनगर येथे शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी चार संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
चोरी, मारामारी, लुटमार असे गंभीर गुन्हे दाखल असलेला अखिलेश हा बुधवारी रात्री तो घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. घरच्यांनी त्याचा शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नव्हता. गुरुवारी सकाळी अजिंक्यनगर झाडीत तो गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.
याची माहिती मिळताच घरातील लोकांनी धाव घेतली. त्याला उपचारार्थ मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. मृत अखिलेशचा भाऊ साजिद मगदूम याने चार संशयिताविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु ठेवली आहे. पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच एकजण पसार झाला आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
झाडीत फेकले
संशयितांनी अखिलेशला काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तो अर्धमेला झाल्यानंतर त्याला झाकीत फेकून संशयित पसार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्याची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांना त्याचा जबाबही नोंदवून घेता आला नाही.