Sangli Lok Sabha Election Result 2024 :सांगली लोकसभेच्या मैदानात ठाकरेंचा पैलवान ६४ हजार मतांनी पिछाडीवर; विशाल पाटलांनी घेतली आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 11:18 AM2024-06-04T11:18:19+5:302024-06-04T11:30:32+5:30
Sangli Lok Sabha Election Result 2024 : सांगली लोकसभेचा निकास समोर येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील पिछाडीवर आहेत.
Sangli Lok Sabha Election Result 2024 ( Marathi News ) :सांगली लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला होता. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. भाजपाने संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली. दरम्यान, आता निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी १६ हजार ८५२ मतांनी आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, विशाल पाटील यांना १००५५४ मतं मिळाली आहेत, तर भाजपाच्या संजयकाका पाटील यांना आतापर्यंत म्हणजेच सकाळी ११ वाजेपर्यंत ८३७०२ एवढी मतं मिळाली आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना १४,७४७ एवढी मतं मिळाली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारापेक्षा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना सकाळी ११ वाजेपर्यंत ८५,८०७ मतं जास्त मिळाली आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत झाली होती. काँग्रेसमधील विशाल पाटील यांनीही महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली होती, पण महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटाला सोडली. विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. दरम्यान, आता विशाल पाटील यांनी आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात प्रचारावेळी जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. दरम्यान, भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्यासाठी सभा घेतल्या होत्या. सांगली लोकसभा मतदारसंघातील निकालावर राज्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी २०१९ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती.