सांगली बाजार समिती राज्यात प्रथम-- पुण्यात गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:17 PM2017-09-28T23:17:34+5:302017-09-28T23:17:34+5:30
सांगली : अनेक उपक्रम राबवून आदर्श वाटचाल करणाºया सांगली बाजार समितीला ‘उत्कृष्ट कार्य बाजार समिती’च्या प्रथम पुरस्काराने राज्य शासनाने सन्मानित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अनेक उपक्रम राबवून आदर्श वाटचाल करणाºया सांगली बाजार समितीला ‘उत्कृष्ट कार्य बाजार समिती’च्या प्रथम पुरस्काराने राज्य शासनाने सन्मानित केले आहे. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सांगली बाजार समितीने गेल्या काही महिन्यांत अनेक चांगले उपक्रम राबविले. यामध्ये ५ रुपयांत शेतकºयांना जेवण, आॅनलाईन बेदाणा सौदे, बळीराजा अॅप, बेदाणा, हळद, गूळ यांच्या व्यापारातील वृद्धी, शुद्ध पाणीपुरवठ्याची सोय, अन्य पायाभूत सुविधा, सततचे वाढते उत्पन्न या गोष्टींचा समावेश आहे. बाजार समितीच्या उल्लेखनीय कार्याची राज्य शासनाने दखल घेऊन ‘उत्कृष्ट कार्य बाजार समिती’ पुरस्कार देऊन गौरव केला. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सांगली बाजार समितीने मिळविले आहे.
राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. दिलीपराव मोहिते-पाटील यांच्याहस्ते सभापती शेजाळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील, एन. एम. दुधाळकर, किशोर कुलकर्णी उपस्थित होते.
नेत्यांच्या सहकार्यामुळेच पुरस्कार मिळाला : शेजाळ
माजी मंत्री पतंगराव कदम, खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, दिनकर पाटील, विक्रम सावंत आदी नेत्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे बाजार समितीने प्रगतीची पावले टाकल्याची भावना शेजाळ यांनी व्यक्त केली. भविष्यातही अनेक चांगले उपक्रम बाजार समितीमार्फत राबविण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.