सांगलीत ‘मी सक्षमा’मुळे मनोरुग्ण महिलेला मिळाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:18 AM2021-07-08T04:18:27+5:302021-07-08T04:18:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनासारख्या महामारीच्या काळात सर्वाधिक हाल सुरू आहेत, ते निराधारांचे. अगोदर घासभर खायला आणि आसरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनासारख्या महामारीच्या काळात सर्वाधिक हाल सुरू आहेत, ते निराधारांचे. अगोदर घासभर खायला आणि आसरा मिळाला तरी त्यांना समाधान असते. मात्र, सध्या यासाठीही संघर्ष करत असलेल्या अशाच एका मनोरुग्ण महिलेला सक्षमा फौंडेशनच्या प्रयत्नामुळे आधार मिळाला. शहरातील विजयनगर परिसरात फिरत असलेल्या एका महिलेला सक्षमा फौंडेशनने मदत करत तिला बेघर केंद्राकडे सुखरुपपणे पोहोचविले.
विजयनगर येथे मंगळवारी रात्रीच्यासुमारास एक महिला रस्त्यावरुन फिरत होती. ही गोष्ट मी सक्षमा फौंडेशनच्या व्यवस्थापिका गीतांजली पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ त्या महिलेची विचारपूस केली; मात्र तिला मराठी येत नसल्याने अडचणी येत होत्या. शिवाय ती महिला केवळ कन्नड बोलत होती. त्यानंतर त्यांनी ही बाब पूजा विशाल पाटील यांना सांगितली असता, आस्था बेघर केंद्रात तिला दाखल करण्यासाठी सांगितले. त्यानुसार तिला आस्था केंद्राकडे सोपविण्यात आले. या प्रक्रियेत आस्था निवारा केंद्राच्या संयोजिका सुरेखा कांबळे व सामाजिक कार्यकर्ते रमेश कुंभार यांनी मदत केली. त्यामुळे एका निराधार मनोरुग्ण महिलेला आधार मिळाला आहे.