सांगली : किरकोळ कारण, पतीकडून पत्नीचा दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 10:39 AM2023-06-14T10:39:32+5:302023-06-14T10:39:44+5:30

जत तालुक्यातील सुसलाद येथील घटना..

Sangli Minor reason murder of wife by husband by throwing stone on head while drunk | सांगली : किरकोळ कारण, पतीकडून पत्नीचा दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून खून

सांगली : किरकोळ कारण, पतीकडून पत्नीचा दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून खून

googlenewsNext

दरीबडची/उमदी : सुसलाद (ता.जत) येथे किरकोळ कारणावरुन पतीकडून पत्नीचा  दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ललिता कल्लाप्पा कांबळे (वय ३५) असे त्यांचे नाव आहे. संशयित आरोपी कल्लाप्पा कांबळे याला उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजता घडली. उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, पूर्व भागातील कर्नाटक सीमेलगत असलेल्या सुसलाद येथे मयत ललित कांबळे या पती तीन मुलासमवेत गावात राहत होत्या. मयत या ऊसतोडणी मजूर होत्या. गावात शेत मजूर म्हणून काम करुन कुंटुब चालवत होत्या. तर आरोपी कोणताही कामधंदा करीत नाही. त्याला दारुचे व्यसन होतं. घरी वारंवार पति पत्नीत भांडण, वादविवाद होत होते

मंळवारी कामानंतर त्या घरी आल्या. रात्री आठ वाजता स्वंयपाक केला. मुले जेवण करुन झोपी गेले. दिवसभर कामाच्या दगदगीमुळे जेवण करुन झ़ोपल्या होती. रात्री साडे दहा वाजता पति दारू पिऊन घरी आला. दारुच्या नशेत पती-पत्नीत किरकोळ कारणावरुन वाद झाला. रागाच्या भरात शेजारी पडलेला दगड पत्नीच्या डोक्यात घातला. यानंतर त्यांच्या डोक्यातून रक्तश्राव मोठ्या प्रमाणात झाला. जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. खून करुन त्यांचा पती कल्लाप्पा कांबळे घटनास्थळी थांबला होता.

या घटनेची माहिती उमदी पोलिसांना देण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण खरात, एस एस शिंदे  यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. संशयित आरोपीला उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.

Web Title: Sangli Minor reason murder of wife by husband by throwing stone on head while drunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.