सांगली महापालिका अंदाजपत्रक : बजेटच्या फुग्यात योजनांची हवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:08 AM2018-04-01T00:08:26+5:302018-04-01T00:08:26+5:30

सांगली : प्रशासकीय बजेटच्या फुग्यात योजनांची आणखी हवा भरून स्थायी समितीने शनिवारी ६७६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका सभेत सादर केले.

Sangli municipal budget: Plan for budget balloon ... | सांगली महापालिका अंदाजपत्रक : बजेटच्या फुग्यात योजनांची हवा...

सांगली महापालिका अंदाजपत्रक : बजेटच्या फुग्यात योजनांची हवा...

Next
ठळक मुद्देस्थायी सभापतींकडून महापौरांना सादर, ४७ कोटींच्या तरतुदी वाढविल्या

सांगली : प्रशासकीय बजेटच्या फुग्यात योजनांची आणखी हवा भरून स्थायी समितीने शनिवारी ६७६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका सभेत सादर केले. सभापती बसवेश्वर सातपुते यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश या अंदाजपत्रकात केला असला तरी, महसुली विभागांच्या कारभारावर बजेटचे आणि त्यातील योजनांचे भवितव्य अवलंबून आहे.

महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा शनिवारी महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत २0१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सातपुते यांनी सादर केले. काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनातर्फे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी स्थायी समितीकडे ६२९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. ४७ कोटी रुपयांच्या जादा तरतुदी करीत स्थायी समितीने अंदाजपत्रकात हवा भरली आहे. सभापती सातपुते यांनी सांगली, मिरजेत भाजीमंडई, ई-लायब्ररी यासह काही ठळक बाबींचा समावेश करून ६७६ कोटी ३१ लाखांचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले. या अंदाजपत्रकावर फारशी चर्चा न करता सर्व सदस्यांच्या सुचविलेल्या कामांचा समावेश या अंदाजपत्रकात करुन सर्वाधिकार महापौरांना देत अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.
उपमहापौर गटाचे नेते नगरसेवक शेखर माने म्हणाले की, हे दिशाभूल करणारे फुगीर अंदाजपत्रक आहे. अन्य सदस्यांनी मागच्यावर्षी अंदाजपत्रकात तरतूद करुनही प्रशासनाने सहकार्य न केल्याने कामे झाली नाहीत. यावेळी असे न करता सर्व सदस्यांची बायनेम कामे धरुन मार्गी लावावीत.

मंगळवारी बैठक
गटनेते किशोर जामदार म्हणाले की, कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी अंदाजपत्रकात तरतूद करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या सदस्यांना वाटते की त्यांची काही कामे राहिली आहेत, त्यांनी आपले प्रस्ताव मंगळवारपर्यंत महापौरांकडे द्यावेत. त्याचदिवशी बैठक घेऊन या कामांचा समावेश अंतिम होणाऱ्या अंदाजपत्रकात करता येऊ शकेल.

उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधा!
स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे म्हणाले, नैसर्गिक नाल्याची रुंदी कमी होत आहे, याची पुन्हा मोजणी करुन नियोजन करावे. त्याचबरोबर महापालिकेच्या अनेक मालमत्ता तिन्ही शहरात पडून आहेत. त्याच्या उत्पन्नाचे नवे स्त्रोत म्हणून वापर करावा. यावेळी युवराज गायकवाड, संतोष पाटील, प्रियांका बंडगर यांनीही अनेक सूचना केल्या.

आकडे ‘स्थायी’च्या अंदाजपत्रकाचे (रकमा कोटीत)
आरंभीची शिल्लक १४५.६0
महसुली जमा ३0१.८९
भांडवली जमा १६३.३0
एकूण जमा ५३0.0७
शिलकेसह जमा ६७६.३१
महसुली खर्च : २३९.0८
भांडवली खर्च : ३७१.३३
डेडहेडस खर्च : ६५.५१
एकूण खर्च : ६७५.९३
शिल्लक : ३८ लाख २0 हजार

Web Title: Sangli municipal budget: Plan for budget balloon ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.