मुकाबला पुराचा..आराखडा तयार सांगली महापालिकेचा; सर्व यंत्रणा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 01:33 PM2024-07-26T13:33:14+5:302024-07-26T13:34:04+5:30
प्रशासन सज्ज : निवारा केंद्र, बोटी, लाईफ जॅकेटस् अन् पथके तैनात
सांगली : पूर येण्यापूर्वीच महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन त्यानुसार पावले उचलण्यास सुरुवात केल्यामुळे पूरपट्ट्यातील नागरिकांना मदत मिळत आहे. स्थलांतराच्या सोयीसह निवारा केंद्र तसेच महापूर आला तर बोटी, लाईफ जॅकेटस्, बचाव पथके आदींची सज्जता झाली आहे. पूरपट्ट्यात येणाऱ्या नागरिकांनी भीती न बाळगता सतर्क राहून महापालिकेच्या या यंत्रणेचा उपयोग करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सांगली व मिरजेत सध्या कृष्णा नदी पात्राबाहेर पडत आहे. सांगलीत कृष्णेची पाणीपातळी ३४ फुटांच्या घरात गेल्यामुळे नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात झाली आहे. मिरजेच्या कृष्णा घाट परिसरातील नागरिकांनीही स्थलांतरास सुरुवात केली आहे. पाणीपातळी किती वाढेल, याचा अंदाज अद्याप कोणालाही नाही. तरीही महापूर आला तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
महापालिकेकडील साधने
अग्निशमन वाहने ७
रेस्क्यू व्हॅन १
लॅडर (३५ फूट उंच) ८
मोठ्या फायबर बोटी ४
लहान फायबर बोटी २
रबर बोट १
ओ.बी.एम. मशीन १३
पेट्रोल चेन सॉ १४
बी. ए. सेट ५
लाईफ जॅकेट ९००
लाईफ रिंग १७
दोर बंडल ४
हेल्मेट ५४
गमबूट ७६
रिफ्लेक्टर जॅकेट ४०
अग्निशमन उपकरणे २४
अस्का लॅम्प २
मेगा फोन २
कॉम्बी टूल्स २
मिनी मोबाईल टॉवर ४
प्रॉक्सिमेटी सूट ४
बॉडी कव्हर बॅग १०
पूर प्रसारण नियंत्रण २
प्रमुख अग्निशमन अधिकारी १
जवान ५१
(लॅडर : उंच किंवा अडचणीच्या ठिकाणी अडकलेल्यांना वाचविण्याचे यंत्र
बी. ए. सेट : ऑक्सिजन कमी असलेल्या ठिकाणी वॉर्निंग देणारे यंत्र)
सांगलीतील महापूर
वर्ष - सर्वोच्च पातळी
- २००५ - ५३.९ फूट
- २०१९ - ५७.६ फूट
- २०२१ - ५४.१० फूट
मिरजेतील महापूर
वर्ष - सर्वोच्च पातळी
- २०१९ - ६९ फूट
- २०२१- ६५ फूट
२०१९ मध्ये पाणी आलेले प्रभाग
सांगली : वॉर्ड क्र. १०, १२, १३, १४, १५, १६, १८ (एकूण ७)
मिरज : वॉर्ड क्र. ५, ७, २० (एकूण ३)
बाधित घरे : २९,२८३
बाधित लोकसंख्या : १,७०,५११
निवारा केंद्रे : ६६
मदत व बचाव कार्य कक्ष - अग्निशमन दल संपर्क क्रमांक
टिंबर एरिया, सांगली - ०२३३-२३७३३३३
स्टेशन चौक, सांगली -०२३३-२३२५६१२
कमानवेस, मिरज - ०२३३-२२२२६१०
आपत्ती व्यवस्थापन कक्ष व संपर्क
७०६६०४०३३०
७०६६०४०३३१
७०६६०४०३३२
पाच बोटिंग क्लब सज्ज
सांगलीतील रॉयल कृष्णा बोट क्लब, तरुण मराठा बोट क्लब, जयंत रेस्क्यू फोर्स, विश्वसेवा फाऊंडेशन, विसावा मंडळ बोट क्लब यांची यंत्रणाही सज्ज आहे.
महापालिकेचे एकूण दवाखाने २१
वस्तीस्तरीय संघ ४६
निवारा केंद्रे ६६
हे ॲप डाऊनलोड करा
महापालिकेने ‘आपत्ती मित्र’ (apatti mitra) तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअरवर ते उपलब्ध आहे. यावर नदी पाणी पातळीची तासाला अचूक माहिती, कोयना व अलमट्टी धरणातील साठ्याची माहिती, बाधित होणारे क्षेत्र, तात्पुरते निवारा केंद्र, सर्व शासकीय कार्यालयांचे संपर्क क्रमांक, आराखडा अशी सर्व प्रकारची माहिती मिळते. ॲपद्वारे मदतही मागता येऊ शकते.