सांगली महापालिका कर्मचाऱ्यांचा दीड कोटीचा प्रॉव्हिडंड फंड जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:22 AM2017-12-24T00:22:39+5:302017-12-24T00:23:58+5:30
सांगली : कपात करूनही खात्यावर जमा न केलेला दीड कोटीचा भविष्य निर्वाह निधी महापालिकेने अल्पवेतनधारक कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केला. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून संघर्ष करीत असलेल्या कामगारांना दिलासा मिळाला आहे.
जानेवारी २०१७ पासून महापालिकाकर्मचाऱ्यांची कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची १ कोटी ५६ लाख ४८ हजार ३४५ रुपयाची रक्कम अखेर महापालिका प्रशासनाने भरली. सांगली महापालिकेचे साधारण १२०० कर्मचारी, बदली, रोजंदारी व मानधनावर काम करतात. वर्षानुवर्षे महापालिकेत काम करुनही महापालिका या कर्मचाऱ्यांकडून अत्यंत अल्प वेतनावर काम करुन घेत होती. या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने वारंवार आंदोलन केले. महापालिकेवर मोर्चा, निदर्शने,न्यायालयीन दावे दाखल केल्यानंतर महापालिकेने किमान वेतनाप्रमाणे वेतन अदा केले.
कर्मचाऱ्यांचा प्रश्न फक्त किमान वेतनापुरता मर्यादीत नव्हता, तर त्यांना कायद्याप्रमाणे महापालिका एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंड फंडसुध्दा देत नव्हती. संघटनेने वारंवार मागणी करुनही महापालिका दाद देत नव्हती. याबाबत महापालिका कामगार सभेचे अध्यक्ष तानाजी पाटील, जॉर्इंट सेक्रेटरी विजय तांबडे, जनरल सेके्रटरी दिलीप शिंदे आदींनी रिजनल प्रॉव्हिडंड फंड कमिशनर, कोल्हापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीत कर्मचाºयांना सदर प्रॉव्हिडंड फंड कायदा ज्या तारखेपासून लागू झाला, त्या तारखेपासून कपात करावा म्हणून मागणी केली होती. सततच्या पाठपुराव्यानुसार महापालिकेने जानेवारी २०१७ पासून कर्मचाºयांना फंड कपात सुरु केली.
मात्र संघटनेने वारंवार पाठपुरावा करुनही कर्मचाºयांना फंडाचे नंबर महापालिका देत नसल्याने शंका उपस्थित केली, यामुळे प्रॉव्हिडंड फंड कार्यालयाचे प्रवर्तक अधिकारी संतोष पोळ यांनी या तक्रारीची दखल घेऊन चौकशी केली असता, महापालिका प्रशासनाने सदर रक्कम कर्मचाºयांच्या खात्यावर जमा केली नसल्याचे स्पष्ट झाले होते.याप्रकरणी फौजदारीच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात १ कोटी ५६ हजार ४८ हजार ४५४ रुपये इतकी रक्कम जमा केली.