गणरायाच्या स्वागतासाठी सांगली महापालिका सज्ज

By शीतल पाटील | Published: September 18, 2023 06:26 PM2023-09-18T18:26:12+5:302023-09-18T18:27:20+5:30

निसर्गाला हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने पालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले आहेत

Sangli Municipality is ready to welcome Ganesh festival | गणरायाच्या स्वागतासाठी सांगली महापालिका सज्ज

गणरायाच्या स्वागतासाठी सांगली महापालिका सज्ज

googlenewsNext

सांगली : गणरायाच्या स्वागतासाठी महापालिकेने जोरदार तयारी केली आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतानाच अधिकाधिक गणेशमूर्तींचे विसर्जनही कृत्रिम तलावात व्हावे, यासाठी महापालिकेने यंदा विसर्जन कुंड, कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. शहरातील विसर्जन मार्गावरील खड्डे मुजविण्यात आले आहेत. कृष्णा नदीवरील घाटांची स्वच्छता करून विसर्जनाची तयारी केल्याचे उपायुक्त राहूल रोकडे यांनी सांगितले

महापालिका क्षेत्रात गणेशोत्सवाची धामधुम सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना मंडपासाठी परवानगी देण्यात आली आहे. पालिकेच्यावतीने पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा व्हावा,यासाठी उपक्रम हाती घेतले आहेत. 

निसर्गाला हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने पालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले आहेत. त्याचा भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदा विसर्जनाच्या वेळी कृत्रिम तलावही उभारण्यात आले आहेत. अशा तलावांतच गणेशमूर्तींचे विसर्जन होण्यासाठी जनजागृतीही केली आहे. गतवर्षी घरगुती व सार्वजनिक मंडळांनी मोठा प्रतिसाद दिला होता. यंदाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वासही आयुक्त राहूल रोकडे यांनी व्यक्त केला.

Web Title: Sangli Municipality is ready to welcome Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली