सांगलीत खुनी हल्लाप्रकरणी संशयिताला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:36 AM2020-12-30T04:36:54+5:302020-12-30T04:36:54+5:30
सांगली : येथील वसंतदादा साखर कारखान्यासमोर प्रतीक दिनकर पाटील (वय २९) या तरुणावर चाकूने खुनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी ...
सांगली : येथील वसंतदादा साखर कारखान्यासमोर प्रतीक दिनकर पाटील (वय २९) या तरुणावर चाकूने खुनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पाचजणांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्रशांत राजकुमार कदम (वय २१), सागर हणमंत पाटील (१८, दोघे रा. सोनी, मिरज), तन्वीर रेहमान कामीरकर (२३), अक्षय संजय पाटील (२१, दोघे रा. धुळगाव, तासगाव), अक्षय अजित पाटील (२०, रा. सांबरवाडी, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जखमी प्रतीक पाटील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्यावर मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. प्रतीक हा सोमवारी दुपारी कुमठे फाटा येथील सरगम धाब्यावर जेवणासाठी गेला होता. त्यावेळी संशयित प्रशांत कदम आणि सागर पाटील हेही त्याठिकाणी होते. प्रतीक आणि संशयित यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून भांडण झाले. त्यानंतर भांडणाचा राग मनात धरून संशयितांनी प्रतीकला पुन्हा गाठले. संशयितांनी चाकूने प्रतीकच्या पोटात वार केले. त्यानंतर खुनी हल्ल्याची गुन्हा दाखल करण्यात आला.