सांगली : नागनाथ अण्णांनी जेल फोडल्याच्या घटनेस पंचाहत्तर वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 03:45 PM2018-09-07T15:45:28+5:302018-09-07T15:54:04+5:30

१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, साताऱ्याच्या प्रतिसरकारचे प्रमुख शिलेदार, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी सोमवार, दि. १० सप्टेंबर १९४४ ला सातारा जेल फोडून पलायन केले होते. त्याला सोमवारी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

Sangli: Nagnath Anna completes fifty-five years of incidents in jail | सांगली : नागनाथ अण्णांनी जेल फोडल्याच्या घटनेस पंचाहत्तर वर्षे पूर्ण

सांगली : नागनाथ अण्णांनी जेल फोडल्याच्या घटनेस पंचाहत्तर वर्षे पूर्ण

Next
ठळक मुद्देनागनाथ अण्णांनी जेल फोडल्याच्या घटनेस पंचाहत्तर वर्षे पूर्ण, सोमवारी सातारा येथे कार्यक्रम

वाळवा : १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, साताऱ्याच्या प्रतिसरकारचे प्रमुख शिलेदार, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी सोमवार, दि. १० सप्टेंबर १९४४ ला सातारा जेल फोडून पलायन केले होते. त्याला सोमवारी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

या घटनेचा अमृतमहोत्सवी समारंभ १० सप्टेंबररोजी सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती क्रंतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समितीतर्फे देण्यात आली.

या अमृतमहोत्सवी समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे उपस्थित राहणार आहेत, तर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

समारंभास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिसप्रमुख पंकज देशमुख, नगराध्यक्षा माधवी कदम उपस्थित राहणार आहेत. हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.

हा समारंभ सोमवार, दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सातारा येथील मध्यवर्ती कारागृहासमोरील हॉटेल ओम एक्झिक्युटिव्हच्या हॉलमध्ये होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्मारक समितीतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Sangli: Nagnath Anna completes fifty-five years of incidents in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.