गॅस दरवाढीविरोधात सांगलीत राष्ट्रवादीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 17:58 IST2021-07-02T17:57:55+5:302021-07-02T17:58:40+5:30
Ncp Sangli Morcha : इंधन दरवाढीनंतर आता गॅसच्या दरात २५ रुपयांची वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

गॅस दरवाढीविरोधात सांगलीत राष्ट्रवादीचे आंदोलन
ठळक मुद्देगॅस दरवाढीविरोधात सांगलीत राष्ट्रवादीचे आंदोलनमोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी
सांगली : इंधन दरवाढीनंतर आता गॅसच्या दरात २५ रुपयांची वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी निदर्शने करण्यात आली यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात महापौर दिग्विजय सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने, सागर घोडके, माजी नगरसेवक शेखर माने, ज्योती आदाटे, वंदना चंदनशिवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.