Sangli: वृद्ध महिलेला मिळाले पाच वर्षानंतर घरकुल, आयर्विन पुलाच्या बांधकामात दिलं होतं योगदान

By शीतल पाटील | Published: August 19, 2023 12:16 AM2023-08-19T00:16:12+5:302023-08-19T00:16:23+5:30

Sangli: कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाच्या बांधकामावेळी मजूर म्हणून काम करणाऱ्या वृद्ध महिलेला महापालिकेने घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर पाच वर्षानंतर वृद्धेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यात आली.

Sangli: Old woman got a house after five years, contributed to the construction of Irwin Bridge | Sangli: वृद्ध महिलेला मिळाले पाच वर्षानंतर घरकुल, आयर्विन पुलाच्या बांधकामात दिलं होतं योगदान

Sangli: वृद्ध महिलेला मिळाले पाच वर्षानंतर घरकुल, आयर्विन पुलाच्या बांधकामात दिलं होतं योगदान

googlenewsNext

- शीतल पाटील 

सांगली - कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाच्या बांधकामावेळी मजूर म्हणून काम करणाऱ्या वृद्ध महिलेला महापालिकेने घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. अखेर पाच वर्षानंतर वृद्धेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यात आली. तिला महापालिकेच्यावतीने संजयनगर घरकुल योजनेतील सदनिका देण्यात आली.

सहा गल्ल्यांची नगरी म्हणून सांगलीची ओळख. कृष्णा नदीकाठी वसलेल्या सांगलीला १९१४ व १९१६ मध्ये प्रलयकारी महापुराचा सामना करावा लागला होता. त्यावेळी महापुरानंतर कृष्णा नदीवर पुल असावा, अशी चर्चा सुरु झाली. तत्कालीन सांगली संस्थानचे अधिपती चिंतामणराव पटवर्धन दुसरे यांनी पुलासाठी पुढाकार घेतला. १९२७ मध्ये कृष्णा नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू झाले आणि १९२९ मध्ये ते पूर्ण झाले. या पुलाचे उद्घाटन तत्कालीन व्हाॅईसराय लार्ड आयर्विन यांच्याहस्ते झाल्याने त्यांचेच नाव पुलाला देण्यात आले. गेली ९३ वर्षे हा पुल अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार बनला आहे.

या पुलाच्या बांधकामावेळी सांगलीतील लक्ष्मी पुजारी यांनी मजूर म्हणून काम केले होते. त्यांनी पुलासाठी दगड डोक्यावरून आणले होते. सध्या पुजारी ११० वर्षाच्या आहेत. पाच वर्षापूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता आली. तेव्हा आयर्विन पुलाच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी पुजारी यांना घरकुल देण्याची घोषणा तत्कालीन महापौर संगीता खोत यांनी केली होती. पुजारी यांची परिस्थिती गरीबीची आहे. त्यांना घर नाही. सध्या त्या नातीकडे राहतात. महापौर खोत यांनी घरकुलाबाबत महासभेत ठरावही केला होता. पण प्रशासकीय मंजुरीत तब्बल पाच वर्षे निघून गेली. नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आता नगरसेवकांचा कार्यकाल संपताना पुजारी यांना संजयनगरमधील पत्राचाळ घरकुल योजनेतील एक सदनिका देण्यात आली.
यावेळी स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी, नगरसेवक राजेंद्र कुंभार, पांडूरंग कोरे, कल्पना कोळेकर, उर्मिला बेलवलकर, महिला बालकल्याण सभापती अस्मिता सरगर उपस्थित होत्या.

Web Title: Sangli: Old woman got a house after five years, contributed to the construction of Irwin Bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली