सांगलीत एकाला चाकूच्या धाकाने लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:30 AM2021-08-20T04:30:35+5:302021-08-20T04:30:35+5:30
सांगली : शहरातील बायपास रोडवरील जकात नाक्याजवळील रस्त्यावर एकाला चाकूचा धाक दाखवून रोख ७ हजार रुपयांसह मोबाईल व इतर ...
सांगली : शहरातील बायपास रोडवरील जकात नाक्याजवळील रस्त्यावर एकाला चाकूचा धाक दाखवून रोख ७ हजार रुपयांसह मोबाईल व इतर साहित्य लुटण्यात आले. याप्रकरणी बाळू पांडुरंग लेंगरे (रा. कर्नाळ रोड, दत्तनगर, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सायंकाळच्या सुमारास वर्दळ असतानाही हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हमाली करणारे बाळू लेंगरे हे बुधवारी सायंकाळी आपले काम आवरुन मल्टीप्लेक्ससमोरील रस्त्यावरुन घरी चालले होते. याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यांना काही कळण्याच्या आतच मागे बसलेल्या तरुणाने चाकूचा धाक दाखवून बाळू यांच्याकडील रोख ७ हजार रुपये आणि ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला व शिवीगाळ, दमदाटी करत ते तिघेही पसार झाले. यानंतर तातडीने लेंगरे यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधून आपली फिर्याद दिली. सायंकाळी सातच्या सुमारास या परिसरात वर्दळ असतानाही लुटमारीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.