शहिदांसाठी धावले सांगलीकर, दौडीस सुरुवात

By शीतल पाटील | Published: November 22, 2022 07:34 PM2022-11-22T19:34:29+5:302022-11-22T19:35:13+5:30

२६ नोव्हेंबरला मुंबईत पोहोचणार दौड

Sangli people runs for the tribute to the sacrifice by martyrs | शहिदांसाठी धावले सांगलीकर, दौडीस सुरुवात

शहिदांसाठी धावले सांगलीकर, दौडीस सुरुवात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: शहीद अशोक कामटे स्मृती फाऊंडेशनच्या वतीने मंगळवारी सांगलीतशहीद दौडीचे आयोजन करण्यात आले. सांगली ते मुंबई अशी ४७० किलोमीटरच्या दौडीला सुरुवात झाली. येत्या २६ नोव्हेंबर रोजी ही दौड मुंबईत पोहोचणार आहे. शहिदांसाठी सांगलीकर उत्स्फूर्तपणे धावले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपायुक्त राहुल रोकडे, उद्योजक गिरीश चितळे, चितळे उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक शशिकांत कुलकर्णी, शरीरसौष्ठवपटू विश्वनाथ बकाली, ऋग्वेद कुलकर्णी, वसंतदादा पाटील कुस्ती केंद्राचे सुनील चंदनशिवे, सिने अभिनेता उमाकांत पाटील यांनी झेंडा दाखवून दौडीला सुरुवात केली.

या दौडीत ४७० किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी निघालेले विद्यार्थी आकर्षण ठरले. त्यामध्ये स्वप्नील माने, अमित कांबळे, प्रतीक नलवडे, वैभव आटुगडे, जयदीप घार्गे, आदित्य लोखंडे, सेहवाग गोसावी, सत्यजित पाटील, प्रथमेश बनसोडे, अमित सोलनकर, अक्षय पाटील, अजय केंगार, स्वप्नील कोळेकर, इरफान जमादार, चंद्रकांत निवरगी, अमित लेंगरे, विश्वनाथ सूर्यवंशी, मयूर लोंढे, ओंकार सुतार, हर्षद एटम, एकलव्य हाबळे, तानाजी पांढरे, प्रथमेश नलवडे, राज मोरे, चैतन्य कदम आदींचा सहभाग होता.

या दौडीमध्ये गुरुकुल इंग्लिश स्कूल, सेन्ट्रल स्कूल, देशभक्त नाथजी लाड विद्यालय, बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमी, सांगली, रॉयल फाईट क्लब, मिरज, क्रॉसफिट फिटनेस अकॅडमी, जयसिंगपूर, अकुज स्पोर्ट्स क्लब, सांगली, ट्रॅडिशनल कराटे- डो असोसिएशन ऑफ सांगली या शाळा व संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तक्षशिला स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांनी शिवकालीन हत्यारे व लाठी- काठी खेळाचे प्रदर्शन करत सांगलीकरांचे स्वागत केले.

जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, डॉ. चंद्रशेखर हळींगळे व इनायत तेरदाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश रोकडे, नजीर मुजावर, देवदास चव्हाण, घनश्याम उके, नीलेश मिसाळ, ललित छाजेड, दीपक पाटील, अजित दुधाळ, सचिन खोंद्रे, संतोष जाधव, प्रदीप सुतार, सुधीर भगत, शमशेर कुरणे, ओंकार जोकार, जयश्री शेलार, पवन कुंभार, अभिजित पाटील, भूषण चिखली, प्रसाद दीक्षित, डॉ. सुभाष पाटील, विजय पडियार हे संयोजन करत आहेत.

Web Title: Sangli people runs for the tribute to the sacrifice by martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.