सांगली : गोळीबारप्रकरणी पिंपळवाडीच्या फरारी सरपंचास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 04:34 PM2018-10-09T16:34:40+5:302018-10-09T16:37:46+5:30
कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील सोन्या ऊर्फ मुकुंद श्रीकांत दुधाळ (वय २५) याच्यावर भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी सराईत गुंड व पिंपळवाडी (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच रमेश आप्पा खोत (वय ४५) यास पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला सोमवारी रात्री यश आले. तो पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे येथे आश्रयाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो फरारी होता.
सांगली : कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील सोन्या ऊर्फ मुकुंद श्रीकांत दुधाळ (वय २५) याच्यावर भरदिवसा गोळीबार केल्याप्रकरणी सराईत गुंड व पिंपळवाडी (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच रमेश आप्पा खोत (वय ४५) यास पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला सोमवारी रात्री यश आले. तो पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे येथे आश्रयाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो फरारी होता.
हिंगणगाव रस्त्यावर सिद्धेश्वर पेट्रोल पंपासमोर २५ जुलै २०१८ रोजी दुपारी दोन वाजता सोन्या दुधाळ याच्यावर रमेश खोत व त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता. गोळ्या डोक्यात घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मिरजेतील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्याच्या डोक्यातून गोळी काढल्याने तो बचावला होता.
याप्रकरणी खोत याच्या दोन साथीदारांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली होती. पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच खोत पसार झाला होता. त्यानेच सोन्यावर गोळीबार करण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.