गुन्हेगार तपास जाळेप्रणालीत सांगली पोलीस राज्यात नंबर वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 09:46 AM2020-09-10T09:46:34+5:302020-09-10T09:52:40+5:30

सीसीटीएनस (क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम) अर्थात गुन्हे आणि गुन्हेगार तपास जाळे प्रणालीच्या राज्यस्तरीय कामकाजात सांगली पोलीस दलाने अव्वल क्रमांक मिळविला आहे.

Sangli police is number one in the state in criminal investigation network | गुन्हेगार तपास जाळेप्रणालीत सांगली पोलीस राज्यात नंबर वन

गुन्हेगार तपास जाळेप्रणालीत सांगली पोलीस राज्यात नंबर वन

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हेगार तपास जाळेप्रणालीत सांगली पोलीस राज्यात नंबर वनतपासणीत १०० टक्के गुण; आॅनलाईन कामकाजात अचूकता








सांगली : सीसीटीएनस (क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम) अर्थात गुन्हे आणि गुन्हेगार तपास जाळे प्रणालीच्या राज्यस्तरीय कामकाजात सांगली पोलीस दलाने अव्वल क्रमांक मिळविला आहे.

जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये दैनंदिन प्रभावी वापर, अचूकता आणि नागरिकांच्या ई-तक्रारींची पूर्तता यामुळे १०० टक्के गुण जिल्हा पोलीस दलाला मिळाले आहेत.


राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सीसीटीएनएस प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे. नागरिकांना कोणताही त्रास न होता सर्व पोलीस ठाण्याचे कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करत आॅनलाईन कामावर भर दिला जात आहे.

पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे. तंत्रज्ञानावर आधारित कामकाजात पोलिसिंग कामात सातत्य ठेवल्यानेच प्रथम क्रमांक मिळविला आहे.


कोरोनाचा कहर लक्षात घेता, पोलीस दलही कोरोना नियंत्रणासाठी व्यस्त आहे. अशा परिस्थितीतही सीसीटीएनएस प्रणालीचा योग्य वापर करण्यात आला आहे. या प्रणालीच्या कामकाजाच्या नोडल अधिकारी मनीषा दुबुले यांनी नियमित आढावा घेतल्याने प्रभावी काम झाले आहे.

राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कक्षाचे नितीन बराले, कावेरी हावगोंडी, तेजश्री पाटील, सिटीनझन पोर्टलच्या निरीक्षक विशाखा पाटील आणि या प्रणालीच्या कामकाजात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अधीक्षक शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक दुबुले यांनी अभिनंदन केले आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जुलै महिन्यात याबाबत राज्यस्तरावर तपासणी केली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून विभागाने दिलेल्या सर्व मानकांमध्ये सांगली पोलीस दलास १०० टक्के गुण मिळाले आहेत. यापूर्वीही २०१९ मध्ये तपासणीत जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आला होता.

 

Web Title: Sangli police is number one in the state in criminal investigation network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.