सांगली :ज्येष्ठ नागरिकांवर पोलिसांकडूनच अन्याय : शरद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 05:04 PM2018-08-11T17:04:42+5:302018-08-11T17:09:17+5:30

भिलवडी येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश निवृत्ती पाटील यांना पोटगी देण्याचे व न दिल्यास कारवाई करण्याचे लेखी शासकीय आदेश होऊनही पोलीस टाळाटाळ करीत आहेत. याविरोधात येत्या २० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.

Sangli: Police only for senior citizens: Sharad Patil | सांगली :ज्येष्ठ नागरिकांवर पोलिसांकडूनच अन्याय : शरद पाटील

सांगली :ज्येष्ठ नागरिकांवर पोलिसांकडूनच अन्याय : शरद पाटील

Next
ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांवर पोलिसांकडूनच अन्याय : शरद पाटील२० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सांगली : भिलवडी येथील ज्येष्ठ नागरिक प्रकाश निवृत्ती पाटील यांना पोटगी देण्याचे व न दिल्यास कारवाई करण्याचे लेखी शासकीय आदेश होऊनही पोलीस टाळाटाळ करीत आहेत. याविरोधात येत्या २० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले की, प्रकाश पाटील यांना कडेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांनी एप्रिल २०१७ मध्येच पोटगी मंजूर केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांनीही तसे आदेश दिले, मात्र तरीही पोटगी मिळत नाही. २००७ मध्ये आपल्या देशात ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि कल्याणासाठी पारित केला आहे. यासाठीची नियमावली महाराष्ट्र शासनाकडूनही २०१० मध्ये तयार केली आहे. या नियमावलीनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची आहे. मात्र दुर्दैवाने ती सांगली जिल्ह्यात राबविली जात नाही.

यासाठीचे अनेक पत्रव्यवहार आम्ही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केला; मात्र त्याला कोणताही प्रतिसाद यांच्याकडून दिला जात नाही. प्रकाश निवृत्ती पाटील यांना ७ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश होते. तरीही त्यांच्या मुलांनी ती देण्यास टाळाटाळ केली. याबाबत भिलवडी येथील सहायक पोलीस निरीक्षकांकडे तक्रार केल्यानंतरही त्यांनी त्याची दखल घेतली नाही.

कारवाईबाबत त्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांचे लेखी आदेश असतानाही त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे उपविभागीय अधिकारी कडेगाव यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या तिन्ही मुलांना जोपर्यंत अटक होत नाही व कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई न करणाऱ्या पोलीस अधिकारी यांच्यावर शनिवार, दि. १८ आॅगस्टपर्यंत कडक कारवाई न झाल्यास जनता दलाचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार असल्याचे यावेळी प्रा. पाटील यांनी सांगितले. यावेळी जनता दलाचे जिल्हाअध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे, सरचिटणीस जनार्धन गोंधळी, शशिकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Sangli: Police only for senior citizens: Sharad Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.