सांगली : महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद निवडणूकीसाठी ११ मार्च रोजी मतदान :डॉ. संजय धकाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:39 PM2018-03-07T16:39:13+5:302018-03-07T16:39:13+5:30
महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद निवडणूक-२०१८ साठी दिनांक ११ मार्च २०१८ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. सांगली जिल्ह्यासाठी मतदान केंद्र क्र. ९ हे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आहे.
सांगली : महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद निवडणूक-२०१८ साठी दिनांक ११ मार्च २०१८ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. सांगली जिल्ह्यासाठी मतदान केंद्र क्र. ९ हे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते यांनी दिली.
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते म्हणाले, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेवर ४ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. मतदार यादीत समाविष्ट मतदारांना मतदानाचा हक्क राहील. मतदान करण्यासाठी मतदारांनी महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेचे फोटो असलेले ओळखपत्र, राज्य शासनाव्दारे जारी करण्यात आलेली सेवा ओळखपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक खात्याचे फोटोसह पासबुक, फोटोसह पेंशन दस्तऐवज यापैकी एक सोबत आणावे.
मतदारांची यादी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सांगली यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहता येईल. तरी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क दिनांक ११ मार्च २०१८ रोजी बजावावा, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते यांनी केले आहे.