सांगलीत पृथ्वीराज पाटील फाउंडेशनतर्फे उद्या पूर परिषदेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:31 AM2021-08-20T04:31:13+5:302021-08-20T04:31:13+5:30
संयोजक पृथ्वीराज पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पालकमंत्री जयंत पाटील उद्घाटक असून कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम ...
संयोजक पृथ्वीराज पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, पालकमंत्री जयंत पाटील उद्घाटक असून कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम प्रमुख पाहुणे आहेत. वडनेरे पूर अभ्यास समितीचे सदस्य तथा लाभक्षेत्र विकास विभागाचे निवृत्त प्रधान सचिव राजेंद्र पवार, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सेंटर फॉर सिटीजन सायन्सचे संचालक मयूरेश प्रभुणे आणि वास्तुविशारद प्रमोद चौगुले हे तज्ज्ञ पुराविषयी विविध अंगांनी विवेचन करणार आहेत. पूरमुक्त सांगलीसाठी उपाययोजनांवर परिषदेत विचारमंथन होईल. पूरपीडित गावांचे सरपंच, उपसरपंच, महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी तसेच पाटबंधारे व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही आमंत्रित केले आहे. पूरस्थिती व उपाय यांविषयी नागरिकांशी तज्ज्ञांचा संवादही यावेळी होणार आहे.
पाटील म्हणाले की, पूर परिषद पक्षविरहित असून खासदार संजय पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांनाही मी स्वत: भेटून निमंत्रण दिले आहे.
परिषदेतील मुद्द्यांचा १० कलमी अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्र्यांना दिला जाणार आहे. यातून पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना तयार करण्यास शासनाला मदत होईल.
चौकट
वडनेरेंचाही सहभाग
वडनेरे समितीचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरेदेखील परिषदेत ऑनलाईन स्वरूपात सहभागी होणार आहेत. २००५ व २०१९ मधील पुराच्या अभ्यासाची निरीक्षणे ते मांडतील.