सांगलीचा 'फुन्सूक वांगडू'.... मराठमोळ्या प्राध्यापकाकडे तब्बल ७५ संशोधनांचे पेटंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 03:32 PM2019-06-17T15:32:14+5:302019-06-17T16:47:00+5:30

अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी पहिले पेटंट नावावर केले होते.

Sangli professor has 75 patent patents | सांगलीचा 'फुन्सूक वांगडू'.... मराठमोळ्या प्राध्यापकाकडे तब्बल ७५ संशोधनांचे पेटंट

सांगलीचा 'फुन्सूक वांगडू'.... मराठमोळ्या प्राध्यापकाकडे तब्बल ७५ संशोधनांचे पेटंट

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीच्या प्राध्यापकाकडे ७५ संशोधनांचे पेटंटपूर्णपणे भारतीय बनावटीचे मायक्रोस्कोप, डिजिटल उपकरणे तयार

सांगली : फार्मसीचे शिक्षण घेत असतानाच लागलेली संशोधनाची आवड. तेव्हाच पॉकेट मनीतून मिळविलेले पेटंट आणि त्यानंतर प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना मेक इन इंडिया उपकरणांच्या संशोधनासाठी आतापर्यंत मिळविलेले ७५ पेटंट ही आगळीवेगळी किमया साधली आहे सांगलीचे प्रा. सचिन लोकापुरे यांनी. संशोधन क्षेत्रातील त्यांच्या या कार्याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली असून. लोकापुरे यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या संशोधनामुळे सांगलीच्या नावलौकिकात भर पडली आहे.

मिरजेचे रहिवासी असलेले व येथील आप्पासाहेब बिरनाळे फार्मसी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले सचिन गंगाधर लोकापुरे यांनी औषध निर्माण शास्त्रात उपयोगी ठरणाऱ्या उपकरणांचा अभ्यास केला आहे. केवळ संशोधन करूनच न थांबता त्यांनी पेटंट घेऊन जागतिक पातळीवर संशोधन नेले आहे.

लोकापुरे यांनी फार्मसीतील पदवीचे शिक्षण घेत असतानाच संशोधनाच्या पेटंटला सुरुवात केली. अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी पहिले पेटंट नावावर केले होते. वैद्यकीय क्षेत्रातील सूक्ष्म रोगनिदानात उपयोगात येणाऱ्या अनेक यंत्रांमध्ये त्रुटी होत्या. यामुळे निदान करताना अडचणी येत होत्या. ही यंत्रे डिजिटल करण्यास लोकापुरे यांनी सुरुवात केली. नंतर ते त्यांचे पेटंट घेऊ लागले. सध्या त्यांच्याकडे पाच युटिलिटी आणि ७० इंडस्ट्रीयल डिझायनिंग पेटंट आहेत.

वैद्यकीय महाविद्यालये, विज्ञान महाविद्यालये, औषध निर्माण शास्त्र शाखांसह जेथे सूक्ष्मदर्शकाच्या (मायक्रोस्कोप) माध्यमातून संशोधन केले जाते, तेथे लोकापुरे यांनी तयार केलेली उपकरणे वापरली जातात. वैद्यकीय क्षेत्रात अनेक रोगांचे सूक्ष्मनिदान करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅबची आवश्यकता असते. तेथे जपान, चीनमधून मायक्रोस्कोप मागविले जातात.

आता लोकापुरे यांच्या संशोधनामुळे मेक इन इंडिया उपकरणे वापरली जात आहेत. पूर्णपणे भारतीय बनावटीचे मायक्रोस्कोप, डिजिटल उपकरणे त्यांनी स्वत: तयार केली आहेत.

Web Title: Sangli professor has 75 patent patents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.