सांगली : आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा केला निषेध, रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:58 PM2018-06-09T12:58:15+5:302018-06-09T12:58:15+5:30
शेतकऱ्यांनी राज्यभर पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने तडवळे येथे आटपाडी-भावघाट रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.
करगणी-सांगली : शेतकऱ्यांनी राज्यभर पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने तडवळे येथे आटपाडी-भावघाट रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.
तडवळे (ता. आटपाडी) येथील बळिराजा शेतकरी संघटनेने रस्त्यावर दुध ओतुन आंदोलन केले.
शेत मालासह दुधाचे दर कोसळल्यामुळे राज्यभर विविध शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन राज्यभर शेतकरी संपाची हाक दिली आहे. या संपाचे लोण आटपाडी तालुक्यातही पोहोचले. बळीराजा शेतकरी संघटनेने आज सकाळी भिवघाट- आटपाडी रस्त्यावर तडवळे येथे रस्ता रोको आंदोलन केले.
बळीराजा शेतकरी संघटनेने आज सकाळी भिवघाट- आटपाडी रस्त्यावर तडवळे येथे रस्ता रोको आंदोलन केले.
आंदोलकांनी एक तास वाहतूक बंद केली होती. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच रस्त्यावर दूध ओतून निषेध केला. बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, तडवळे शाखाध्यक्ष अमित गिडे, शिवाजी खिलारी आदींनी सहभाग घेतला होता.