‘वंदे भारत’च्या तिकीट विक्रीत सांगलीचा विक्रम, करंट बुकिंगमध्ये कोल्हापूरचे शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:56 AM2024-09-19T11:56:22+5:302024-09-19T11:56:58+5:30

सांगली : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसवर सांगलीकर प्रवाशांनी भरभरून प्रेम व्यक्त करीत तिकीट विक्रीचा मोठा विक्रम ...

Sangli record in Vande Bharat ticket sales, Kolhapur century in current bookings | ‘वंदे भारत’च्या तिकीट विक्रीत सांगलीचा विक्रम, करंट बुकिंगमध्ये कोल्हापूरचे शतक

‘वंदे भारत’च्या तिकीट विक्रीत सांगलीचा विक्रम, करंट बुकिंगमध्ये कोल्हापूरचे शतक

सांगली : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसवर सांगलीकर प्रवाशांनी भरभरून प्रेम व्यक्त करीत तिकीट विक्रीचा मोठा विक्रम नाेंदविला. बुकिंगच्या पहिल्याच दिवशी सांगली-पुणे व पुणे-सांगली या मार्गावर वंदे भारतच्या दोन गाड्यांमध्ये एकूण १७५ तिकिटे सांगलीकरांनी काढली. यातून सुमारे सव्वा लाखाचे उत्पन्न त्यांनी रेल्वेला दिले.

हुबळी-सांगली-पुणे वंदे भारत गाडीत पहिल्या दिवशी सांगली स्थानकापासून शंभर तिकिटांची विक्री झाली. गाडी (क्र. २०६६९) हुबळी-सांगली-वंदे भारत गाडीत सांगली स्टेशनवरून सकाळी सहा वाजेपर्यंत ९० तिकिटे विकली गेली. सकाळी ७ ते सव्वा नऊच्या दरम्यान सांगली स्टेशनवरून वंदे भारत सुटण्याच्या आधी करंट बुकिंगमध्ये आणखी दहा ते बारा तिकिटे विक्री झाली.

पहिल्याच दिवशी वंदे भारत गाडीने सांगली रेल्वे स्थानकावरून एकाच फेरीत शंभर तिकिटांची विक्री पार केल्यामुळे एक नवा विक्रम सांगलीच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर पुणे-सांगली-कोल्हापूर वंदे भारत गाडीत पुणे ते सांगली या परतीच्या मार्गावर ७५ तिकिटांची विक्री झाली.

अशी झाली तिकिटविक्री

सांगली १७५
मिरज १३०
बेळगाव ११०
कोल्हापूर ९४
हुबळी २६
धारवाड २५
सातारा १०
(यात करंट बुकिंगचा समावेश नाही)

करंट बुकिंगमध्ये कोल्हापूरचे शतक..

सांगली स्थानकावरुन सर्वाधिक तिकिट विक्री झाली असली तरी मिरज व कोल्हापूर या स्थानकांमधूनही वंदे भारतला मोठा प्रतिसाद लाभला. करंट बुकिंगचा विचार केल्यास कोल्हापूरनेही शतक गाठले आहे. कोल्हापूरची तिकिटविक्री एकाच फेरीची आहे.

सांगलीतील गर्दीला सलाम

‘वंदे भारत’चे १६ सप्टेंबरला उद्घाटन झाल्यानंतर सांगलीत गाडीच्या स्वागतासाठी स्थानकावर मोठ्या जल्लोषात व उत्साहात स्वागत केले. याची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली. गाडीतून घेतलेला व्हिडीओ रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडियावर प्रसिद्ध करीत सांगलीतील जंगी स्वागताबद्दल कौतुकोद्गार काढले. पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुप व सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपतर्फे सर्वच प्रवाशांचे आभार मानले.

Web Title: Sangli record in Vande Bharat ticket sales, Kolhapur century in current bookings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.