सांगलीत तीन महिन्यानंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 06:10 PM2020-11-04T18:10:54+5:302020-11-04T18:14:10+5:30
CoronaVirus, sanglinews तीन महिन्यानंतर जिल्ह्यात मंगळवारी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ७४ नवे रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी महापालिका क्षेत्रात एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
सांगली : तीन महिन्यानंतर जिल्ह्यात मंगळवारी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ७४ नवे रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी महापालिका क्षेत्रात एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. महापालिका क्षेत्रात मंगळवारी १८ कोरोना रुग्ण आढळून आले. यात सांगलीत ६ तर मिरज शहरात १२ जणांचा समावेश आहे. आटपाडी, पलूस तालुक्यात प्रत्येकी दोन, कडेगाव तालुक्यात ६, खानापूरमध्ये १३, तासगावात १२, जतमध्ये १, कवठेमहांकाळ व वाळवा तालुक्यात प्रत्येकी ५, मिरज ७, शिराळा तालुक्यात तीन रुग्ण आढळून आले. तर तासगाव व शिराळा तालुक्यातील दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला.
दिवसभरात आरटीपीसीआरच्या ५८५ चाचण्या करण्यात आल्या. यात २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर अँटीजेनच्या १९१५ चाचण्यात ५७ रुग्ण सापडले. सध्या १५९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ऑक्सीजनवर १२५, हायफ्लो नेझल ऑक्सीजनवर ६, नॉन इन्व्हेजीव व्हेंटिंलेटरवर २६ तर इन्व्हेजीव व्हेंटिलेंटरवर २ जण आहेत.
सांगलीकरांना दिलासा
जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ झाली. सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाचा कहर झाला होता. तब्बल २४ हजार रुग्ण या महिन्यात सापडले होते. पण गेल्या चार ते पाच दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली.
दिवसभरात
- आजचे रुग्ण : ७४
- उपचाराखालील रुग्ण : १३७५
- आजअखेर बरे झालेले रुग्ण : ४२,३६९
- मृत रुग्ण : १६५०
- आजअखेरचे एकूण रुग्ण : ४५,३९४
- चिंताजनक : १५९