सांगली : शिक्षक बँकेत नियम डावलून नोकरभरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:03 AM2018-12-07T00:03:24+5:302018-12-07T00:04:07+5:30
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत आकृतिबंध डावलून सत्ताधाऱ्यांनी नोकरभरती केली आहे. याविरोधात कोल्हापूर विभागीय निबंधकांकडे तक्रार केली आहे.
सांगली : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत आकृतिबंध डावलून सत्ताधाऱ्यांनी नोकरभरती केली आहे. याविरोधात कोल्हापूर विभागीय निबंधकांकडे तक्रार केली आहे. सत्ताधाºयांच्या मनमानी कारभार व बेकायदा नोकरभरतीविरोधात लवकरच बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघाचे नेते पोपटराव सूर्र्यवंशी व राज्य उपाध्यक्ष हंबीरराव पवार यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिला.
ते म्हणाले की, बँकेची सत्ता समितीच्या हाती आल्यानंतर दहा कर्मचाºयांची भरती केली. आता छुप्या पद्धतीने १२ कर्मचारी भरले आहेत. बँकेचा कर्मचारी आकृतिबंध १६२ चा असून, तितके कर्मचारी कार्यरत आहेत. सभासद व संचालकांनाही अंधारात ठेवून नव्या लोकांची भरती केली जाते. साध्या वहीवर संबंधितांच्या सह्या केल्या जातात व तीन महिने पूर्ण होताच त्यांना गुपचूप आॅर्डर दिल्या जातात.
भरतीविरोधात कोणीही न्यायालयात जाऊ नये, यासाठी आॅर्डरच्या प्रती हाती लागू देत नाहीत, असाही आरोप केला. बँकेच्या दोन कर्मचारी युनियनपैकी एका संघटनेने नोकर भरतीला औद्योगिक न्यायालयात स्थगिती मिळविल्याचे समजते. तसे असेल तर नोकर भरती कशी करता येईल, असा सवालही केला.
बँकेचे कार्यक्षेत्र वाढविण्याच्या नादात जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले आहे. या सभासदांच्या कर्जाचे हप्ते थकले असून, थकबाकी कोटीच्या घरात गेली आहे. भविष्यातही थकबाकी वाढणार असल्याचे ते म्हणाले. याकडे सत्ताधाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.
अध्यक्ष निवडीची संगीत खुर्ची
समितीच्या नेत्यांना मनमानी कारभार करता यावा, यासाठी अध्यक्ष निवडीचा खेळ मांडला आहे. चार महिनेच अध्यक्षाला कालावधी दिला जात आहे. सध्याच्या अध्यक्षांचा तर तीन महिन्यातच राजीनामा घेतला आहे. चुकीची नोकरभरती, मनमानी कारभार, खरेदी-दुरूस्तीवर होणारा चुकीचा खर्च याला विरोध म्हणूनच विद्यमान अध्यक्षांनी घाईगडबडीत राजीनामा दिला आहे. २० वर्षे सत्तेची स्वप्ने पाहणाºयांची पायाखालची वाळू सरकू लागल्याची टीकाही त्यांनी केली.