सांगली : खेराडे वांगीच्या बत्तीस जणांचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 01:35 PM2020-05-02T13:35:11+5:302020-05-02T13:40:14+5:30
'स्वॅब'चे दुसऱ्यांदा नमुने आरोग्य विभागाने घेवून ते मिरजेतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज सायंकाळी निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्वानाच मोठा दिलासा मिळाला आहे तर मयत तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या ३२ जणांच्या 'स्वॅब'चे नमुने दुसऱ्यांदा निगेटिव्ह आले आहेत.
कडेगाव ( सांगली ) : मुंबई येथे मृत्यू झाल्यानंतर खेराडे-वांगी (ता. कडेगाव) येथे अंत्यसंस्कार झालेल्या तरूणाच्या संपर्कातील ३२ जणांचा अहवाल आज ''दुसऱ्यांदा निगेटिव्ह' आला आहे. त्यामुळे या सर्वांना शनिवारी (ता.२)रोजी संस्थात्मक क्वारंटाईनमधून घरी सोडले आहे.त्यांना आता १४ दिवस होम क्वारंटाईन मध्ये राहावे लागणार आहे.
दरम्यान संस्थात्मक विलगीकरणातुन सोडल्यामुळे त्यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. खेराडे-वांगी येथील तरूणाचा मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये शनिवारी (ता.१८ एप्रिल) रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला होता . सायन हॉस्पिटलने तसे मृत्यू प्रमाणपत्र नातेवाईकांना दिले होते . त्यामुळे त्याच्या पत्नीने मृतदेह खेराडे-वांगी येथे रविवारी (ता.१९) शववाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी आणला. बुधवारी (ता.२२ ) मृत तरूणाला "कोरोना' झाला आहे असा चुकीचा (नजरचुकीने) अहवाल सायन हॉस्पिटलकडून प्रशासनाला पाठवला गेला होता. त्यामुळे खेराडे-वांगी गावासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली.
पोलिस प्रशासनाने तत्काळ गाव "लॉक' केले. तसेच प्रशासनाने मृत तरूणाच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्यांची माहिती संकलित केली. संपर्कातील ३२ व्यक्तींना कडेगाव येथे संस्थात्मक क्वारंटाईन केले. लगेच त्यांच्या "स्वॅब'चे नमुने घेऊन ते मिरजेतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा पहिला अहवाल "निगेटिव्ह' आला होता. त्यामुळे संबंधितासह त्यांचे नातेवाईक आणि सर्वांनाच दिलासा मिळाला तर काल गुरुवारी (ता.३०) सात दिवसानंतर खेराडे वांगी प्रकरणी संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या ३२ जणांच्या घशातील
'स्वॅब'चे दुसऱ्यांदा नमुने आरोग्य विभागाने घेवून ते मिरजेतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज सायंकाळी निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्वानाच मोठा दिलासा मिळाला आहे तर मयत तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या ३२ जणांच्या 'स्वॅब'चे नमुने दुसऱ्यांदा निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना कडेगाव येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षातून घरी सोडले आहे. मात्र त्यांना घरातच १४ दिवस होम क्वारंटाईन म्हणून रहावे लागणार आहे.