सांगलीत रिक्षा चालकास लुबाडले, शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 03:55 PM2019-03-18T15:55:27+5:302019-03-18T15:57:06+5:30

मिरजेतील कैकाडी गल्लीतील चंद्रकांत सुरेश माने (वय २८) या रिक्षा चालकास बेदम मारहाण करुन लुबाडण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईल व सातशे रुपयांची रोकड लंपास केली. मुख्य बसस्थानकाजवळील मॉडर्न बेकरीजवळ रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangli rickshaw driver looted, shouting sloganeering and lathabukaake beat breath | सांगलीत रिक्षा चालकास लुबाडले, शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

सांगलीत रिक्षा चालकास लुबाडले, शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

Next
ठळक मुद्देसांगलीत रिक्षा चालकास लुबाडले, शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल मोबाईल, रोकड लंपास

सांगली : मिरजेतील कैकाडी गल्लीतील चंद्रकांत सुरेश माने (वय २८) या रिक्षा चालकास बेदम मारहाण करुन लुबाडण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईल व सातशे रुपयांची रोकड लंपास केली. मुख्य बसस्थानकाजवळील मॉडर्न बेकरीजवळ रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरभ (पूर्ण नाव निष्पन्न नाही) तसेच दोन अनोळखी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. चंंद्रकात माने मिरज ते सांगली प्रवासी वाहतूक करतात. रविवारी सायंकाळी पाच वाजता ते प्रवासी घेऊन सांगलीत आले होते. मुख्य बसस्थानकाजवळ ते प्रवासी उतरल्यानंतर मॉडर्न बेकरीजवळ मिरजेला प्रवासी नेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी संशयित तिघे त्यांच्याजवळ आले.

माने यांनी रिक्षातील डॅशबोर्डसमोर मोबाईल ठेवला होता. तो संशयितांनी उचलून घेण्याचा प्रयत्न केला. माने यांनी त्यांना विरोध केला. आपण कोण, मोबाईल का हात लावला आहेह्ण, अशी विचारणा केली. यातून त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. संशयितांनी माने यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या शर्टाच्या खिशातील सातशे रुपये काढून घेतले. नागरिकांनी गर्दी करताच संशयित पसार झाले. माने यांनी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली.

जबरी चोरीचा गुन्हा

सौरभसह तिनही संशयितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध घेणे आव्हान बनले आहे. या मॉडर्न बेकरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेऊन संशयितांचा शोध सुरु ठेवला आहे. ते त्याच परिसरातील असावेत, असा अंदाज आहे.

Web Title: Sangli rickshaw driver looted, shouting sloganeering and lathabukaake beat breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.