सांगलीत रिक्षा चालकाकडून विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:34 PM2018-07-10T14:34:51+5:302018-07-10T14:37:17+5:30
रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकानेच नऊ वर्षीय विद्यार्थीनीशी रिक्षातच अश्लिल चाळे केले. सांगलीत सोमवारी सकाळी अकरा ते साडेअकरा दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षाचालक उदय बाळासाहेब शिंदे (रा. सांगली) याच्याविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
सांगली : रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकानेच नऊ वर्षीय विद्यार्थीनीशी रिक्षातच अश्लिल चाळे केले. सांगलीत सोमवारी सकाळी अकरा ते साडेअकरा दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षाचालक उदय बाळासाहेब शिंदे (रा. सांगली) याच्याविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
पिडित मुलगी संजयनगर परिसरातील एका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तिसरीत शिकत आहेत. संशयित उदय शिंदे हा रिक्षातून या शाळेत विद्याथ्यांना ने-आण करण्याचे काम करतो. पिडित मुलगीही त्याच्या रिक्षातून जाते. सोमवारी सकाळी अकरा वाजता शाळा सुटल्यानंतर शिंदे यांने सर्व विद्यार्थी व विद्यार्र्थींनींना रिक्षात घेतले.
प्रत्येक विद्यार्थ्यास त्याने घरी जाऊन सोडले. रिक्षात केवळ ही मुलगीच राहिली होती. तिला घरी सोडण्यास जाताना त्याने मुलीशी रिक्षातच अश्लिल चाळे गेले. त्यानंतर साडेअकरा वाजता त्याने मुलीला घरी सोडले.
घरी गेल्यानंतर मुलीने आई, वडिलांना हा प्रकार प्रकार सांगितला. सायंकाळी वडिलांनी मुलीला घेऊन संजयनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शिंदेविरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुन्हा वाहतूक
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व्हावा, यासाठी पंधरा दिवसापूर्वी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी बेकायदेशीर वाहनांवर कारवाई सुरु केली. मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने दोन-चार दिवस रिक्षातून वाहतूक करणारे चालक गायब झाले होते. त्यानंतर पुन्हा रिक्षातून विद्यार्थी वाहतूक सुरु झाली आहे. पण रिक्षा चालक शिंदे याने विद्यार्र्थींनीशी अश्लिल वर्तन केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.