सांगली : संदीप मोहिते-चौगले यांचे दोन दिवसांत निलंबन, प्रस्ताव तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 06:41 PM2018-03-21T18:41:41+5:302018-03-21T18:41:41+5:30
कंत्राटी परिविक्षा अधिकाऱ्यास पुनर्नियुक्ती देऊन कामावर हजर करून घेण्यासाठी दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी येथील जिल्हा व बालविकास अधिकारी संदीप दौलतराव मोहिते, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद नारायण चौगुले व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजेंद्र कृष्णा भाट यांच्यावर दोन दिवसांत निलंंबनाची कारवाई होणार आहे. आयुक्त कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. ही कारवाई मंत्रालय स्तरावर होत असते. त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम बुधवारी आयुक्त कार्यालयात सुरू होते.
सांगली : कंत्राटी परिविक्षा अधिकाऱ्यास पुनर्नियुक्ती देऊन कामावर हजर करून घेण्यासाठी दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी येथील जिल्हा व बालविकास अधिकारी संदीप दौलतराव मोहिते, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद नारायण चौगुले व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजेंद्र कृष्णा भाट यांच्यावर दोन दिवसांत निलंंबनाची कारवाई होणार आहे.
आयुक्त कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. ही कारवाई मंत्रालय स्तरावर होत असते. त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम बुधवारी आयुक्त कार्यालयात सुरू होते.
संदीप मोहिते व चौगले हे दोघेही कोल्हापुरात राहतात. मोहिते हा कोल्हापूर शहर बालविकास प्रकल्प अधिकारी आहे. त्यांच्याकडे सांगली जिल्हा महिला बालविकास विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. मोहिते व चौगले हे ‘वर्ग एक’ आणि ‘दोन’चे अधिकारी असल्याने त्यांच्या निलंबनाचे अधिकार मंत्रालय स्तरांवर आहेत.
‘बाल संरक्षण अधिकारी’ हे पद कंत्राटी स्वरूपाचे आहे. एकात्मिक बाल संरक्षण कक्ष हा विभागच कायमस्वरूपी कंत्राटी स्वरूपात आहे. त्यामुळे भाट यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवरील असते.
सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे खात्याकडून त्यांच्यावरील कारवाई लांबली तर सरकारवर टीका होऊ शकते, या भीतीपोटी या अधिकाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवाईची सूत्रे वेगाने हलली आहेत.