Sangli: ट्रॅक्टरखाली सापडून शाळकरी मुलगा मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 22:15 IST2023-12-16T22:14:31+5:302023-12-16T22:15:10+5:30
Sangli News: सय्यदवाडी (येळापुर ता. शिराळा) येथे ट्रॅक्टरच्या खाली सापडून अति रक्तस्त्राव झाल्याने अनुज दिलीप पाटील (वय 11)या शाळकरी मुलगा मृत्युमुखी पडला.

Sangli: ट्रॅक्टरखाली सापडून शाळकरी मुलगा मृत्युमुखी
कोकरुड - सय्यदवाडी (येळापुर ता. शिराळा) येथे ट्रॅक्टरच्या खाली सापडून अति रक्तस्त्राव झाल्याने अनुज दिलीप पाटील (वय 11) हा शाळकरी मुलगा ठार झाला. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळा वरुन मिळालेली माहिती अशी की सय्यदवाडी येथील ज्ञानदेव उर्फ बाबा पाटील हे त्यांच्या ट्रॅक्टर क्रमांक (एम एच 27 एल 999) ने वाल्मीक बापू दिंडे यांच्या शेतात काम इचरने (पाच फणाचा नांगर ) चे करत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या तिसरी इत्तेत शिकणारा अनुज पाटील शाळा सुटल्यानंतर तसाच शेतात काम सुरु असलेल्या ट्रॅक्टर कडे गेला. त्याला ट्रॅक्टरच्या मागील फणावर बसायचे असल्याने तो ट्रैक्टर मागून फिरत होता.बाबा पाटील यांनी त्यास अनेक वेळा घरी जाण्यास सांगितले होते.त्त्यानंतर घरी जाऊन लगेच परत येऊन बांधावर बसला होता.
त्याच ट्रॅक्टर ड्रायवरचे लक्ष्य नसताना तो ट्रॅक्टरच्या फणावर जाऊन बसला.त्याच वेळी ट्रॅक्टरचा फणाचा जोरदार धक्का बसून अनिकेत खाली पडला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच जीव गेला. तरीही त्याला कराड येथील खाजगी रुगणालयात घेऊन गेले असता तो मृत असल्याचे डॉक्टर नी घोषित केले. या बाबतचा गुन्हा कराड पोलिसात दाखल करण्यात आला आहे.मयत अनुज चे वडील ट्रक चालक असून ते चेन्नई येथे असल्याने त्याच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे.