सांगली : शहीद पोलिसांना सांगलीत अभिवादन -प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण : पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:51 PM2018-11-27T12:51:06+5:302018-11-27T12:51:26+5:30
मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सोमवारी अभिवादन करण्यात आले. सांगली-विश्रामबाग रस्त्यावरील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या
सांगली : मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सोमवारी अभिवादन करण्यात आले. सांगली-विश्रामबाग रस्त्यावरील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानाजवळील शहीद अशोक कामटे चौकात हा कार्यक्रम पार पडला.
शहीद अशोक कामटे चौकात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या छायाचित्रांचा फलक लावण्यात आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस कर्मचाºयांच्यावतीने मेणबत्त्या प्रज्ज्वलित करून अभिवादन केले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, अनिल पोवार, दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, मिलिंद पाटील, प्रताप पोमण, राजाराम सातवेकर, वाहतूक शाखेचे अतुल निकम, संतोष डोके, कैलास कोडग, मनोज सोनवलकर यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेक नागरिकांनीही शहिदांना श्रद्धांजली वाहिली.