Sangli: मिरजेतील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची ईडीकडून चौकशी, नोटिशीमुळे खळबळ: एक सप्टेंबरला पुन्हा हजर राहण्याची सूचना
By शीतल पाटील | Published: August 7, 2023 11:32 PM2023-08-07T23:32:25+5:302023-08-07T23:32:42+5:30
Sangli News:
- शीतल पाटील
सांगली : मिरजेचे उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचे ईडी कडून नुकतीच चौकशी करण्यात आल्याचे समजते त्यामुळे मिरज सर्वात खळबळ उडाली आहे या पदाधिकाऱ्याला पुन्हा एक सप्टेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन महिन्यांपूर्वी सांगली शहरातील एका व्यापाऱ्यावर ईडीने छापे टाकले होते. या छाप्याच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकाऱ्याला नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांची ६ जुलै रोजी चौकशी झाली असून आता पुन्हा एक सप्टेंबर पर्यंत ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याबाबत फोनवरून सांगण्यात आल्याचे समजते. संबंधित व्यापाऱ्यांच्या जागा देवाण-घेवाण प्रकरणात या नेत्याचे चौकशी ईडीकडून सुरू असल्याची चर्चा मिरज शहरात आहे.