सांगलीत सिमला सफरचंदाला २५ किलोला ५१०० रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:04+5:302021-08-01T04:25:04+5:30
सांगली : येथील फळ बाजारात सिमला सफरचंदाची आवक सुरू झाली आहे. शनिवारी सौद्यांचा प्रारंभ झाला. २५ किलो वजनाच्या पेटीला ...
सांगली : येथील फळ बाजारात सिमला सफरचंदाची आवक सुरू झाली आहे. शनिवारी सौद्यांचा प्रारंभ झाला. २५ किलो वजनाच्या पेटीला तब्बल ५१०० रुपये विक्रमी दर मिळाला. प्रतिकिलो २०४ रुपयांवर दर पोहोचला. दहा वर्षांतील सर्वांत उच्चांकी दर मिळाल्याने उत्पादकांनी आनंद व्यक्त केला.
सध्या दररोज ५०० पेट्या सफरचंदांची आवक सुरू आहे. सणासुदीचे दिवस सुरू दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. १५ ऑगस्टपासून आवक आणखी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापारी अशोक मदने, सागर मदने यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे सध्या आवक व विक्री तुलनेने कमी आहे. तरीही हिमाचल प्रदेशातून काही प्रमाणात गाड्या येत आहेत. शनिवारच्या सौद्यामध्ये उच्चांकी दर मिळाल्याने आवक आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. सांगलीतून कोल्हापूर, सातारा, सोलापूरलाही सफरचंद पाठविले जातात. पाऊस व महापुरामुळे सौद्यांना काही प्रमाणात विलंब झाला.