सांगली : नगरसेवक मारहाणप्रकरणी भाजपच्या बंदला उस्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:56 PM2018-04-04T12:56:37+5:302018-04-04T12:56:37+5:30
तासगावचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करत असताना जिल्हा पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी तासगाव पोलिस ठाण्यात येवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन मारहाण केली. याचा निषेध म्हणून भाजपने बुधवारी पुकारलेल्या तासगाव बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तासगाव : तासगावचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करत असताना जिल्हा पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी तासगाव पोलिस ठाण्यात येवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन मारहाण केली. याचा निषेध म्हणून भाजपने बुधवारी पुकारलेल्या तासगाव बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केली होती. याची फिर्याद देण्यासाठी ते तासगाव पोलिस ठाण्यात गेले होते. त्यांची फिर्याद दाखल करुन घेतली जात असताना सांगलीहून पोलिस अधिक्षक शर्मा आले व नगरसेवक बाबासाहेब पाटील कोण आहे, अशी विचारणा केली व शिवीगाळ करुन मारहाण केली.
यानंतर त्यांना आरोपीप्रमाणे जमिनीवर बसवले. हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस व राष्ट्रवादीने खासदारांच्याविरोधात रचलेला हा कट आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
याचवेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी भाजपचे नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना मारहाण केल्याचा आरोपावरून तासगावात भाजपच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.